२२१.
सागवानी टेबलावर रुमाल टाकतें विणून
x x x रावांचं नांव घेतें आग्रह केला म्हणून.
२२२.
विठोबाच्या शिखराला सोन्याचा कळस
x x x रावांचं नांव घ्यायला मला नाहीं आळस.
२२३.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या गिन्न्या
x x x रावांचं नांव घेते पवारांची कन्या.
२२४.
सोन्याची आंगठी हिरव्या शालूंतून झळकली
x x x रावांची मूर्ति आगगाडींतून वळखली.
२२५.
मोठे मोठे मोतीं कानांतील कुडीला
x x x रावांचं नांव घेतें मैत्रीणींच्या जोडीला.
२२६.
आत्तांच्या राज्यांत बांगडया भरतें तीन तीन
x x x रावांच्या खमीसाला फौन्टपेन एकच यीयमीन.
२२७.
चांदीच्या ताटांत, वेलदोडे घातले भातांत,
x x x रावांची स्वारी निघाली कचेरीस, छत्री देतें हातांत.
२२८.
धाकटयानें राखावा वडिलांचा आदर
x x x रावांचं नांव घेतलें सोडा आतां पदर.
२२९.
सुनेस जशी सासू, तसा मुलांस पंतोजी
x x x रावांची झाली नाहीं कधीं मजवर नाराजी.
२३०.
चंदनाच्या झाडावरती देवी घेते विसावा
x x x रावांचें नांव घेतें आशीर्वाद असावा.
२३१.
साखरेच्या गाठया निरीच्या घोळ्यांत
x x x रावांचें नांव घेतें सुवासिनींच्या मेळ्यांत.
२३२.
माळ्याच्या मळ्यांत चालली होती मोट
x x x राव घ्या पाण्याचा घोट.
२३३.
गणेशचतुर्थीच्या दिवशीं गणपती केला शाडूचा
x x x राव घांस घ्या लाडूचा.
२३४.
द्राक्षाच्या वेलाला त्रिकोणी पान, मी हिंडलें हिंदुस्थान
x x x राव मिळाले ही रत्नाची खाण.
२३५.
चंदनाच्या झाडाखालीं नागिणीची वस्ती
x x x रावांचें नांव घेतें आग्रह झाला जास्ती.
२३६.
सोनेरी डबींत अत्तराचा बोळा
x x x रावांचं नांव घेतें शंभर रुपये तोळा.
२३७.
पंढरपूरचा चुडा, काशीचा विडा, मथुरेचीं पानं, खायला छान, चिमणा आंबा,
त्याच्या केल्या फोडी, आईबापांना गोडी, समोर होती तुळशीची बाग, बागेंत
होती सीता, तिच्याजवळ होती कळशी, कळशींत होतं गंगेचं पाणी
x x x रावांचं नांव घेतें पंचामृतावाणी.
२३८.
समोर होता कोनाडा, कोनाडयांत होती सरी, सरी गेली सरकून, नांव घेतें पारखून
x x x रावांच्या हाताखालीं पांचशें कारकून.
२३९.
काळ्या मण्यांची पोत हें सौभाग्याचं लेणं
x x x रावांच्या जिवावर x x x चं अवलंबून जिणं.
२४०.
चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
x x x रावांचं नांव घेतें माझी वाट सोडा.