६१.
श्रावणाच्या महिन्यांत जिकडे तिकडे पाणी
x x x रावांच्या भेटीसाठी मी झाले आतुर चातकपक्षावाणी.
६२.
नांवामध्ये आहे काय, नका हट्ट धरुं
x x x रावांच्या नांवाचा उखाणा चांगलासा जूळत नाही त्याला मी काय करुं ?
६३.
घरोघरी त्याचपरी, कोणाला सांगायच काय
x x x रावांच्या आज्ञेशिवाय पुढे टाकत नाही पाय.
६४.
सोन्याच्या घागरी गुलालांनी घासल्या
x x x रावांच नांव घेतां सख्या सगळ्या हंसल्या
६५.
नको गोट पाटल्या , नको पिळाची सरी
x x x रावांच्या जीवावर काळी गळसुरी बरी.
६६.
कौलारु घर त्याला मुरुमाची भर, अंबीरशाही फेटा ,नारळी पदर
x x x रावांच्या चेहर्याकडे पाहतांना थांबत नाही नजर.
६७.
कल्चर मोत्याला सुईसारखे वेज
x x x रावांच्या चेहर्यावर सूर्यासारखं तेज.
६८.
साजूक तुपांत नाजूक चमचा
x x x रावांचं नांव घेते आशीर्वाद तुमचा
६९.
दशक नको, सुट्टे नको , अंक मोजा साठ
x x x रावांचं नांव घेऊन बांधते आठवणीची गांठ .
७०.
सोन्याची सुपली मोत्यानं गुंफली
x x x रावांची राणी कामाला गुंतली.
७१.
निसर्गाच्या अंतरंगात पावित्र्याचा सुवास
x x x रावांच्या जोडीनं करीन आयुष्याचा प्रवास.
७२.
लता डोले, फूल डोले, डोले वनश्री
x x x रावांचं नांव घेतें x x x भाग्यश्री.
७३.
लक्ष्मी शोभते दानानं, विद्या शोभते विनयानं
x x x च्या जीवावर मी राहतें मानानं.
७४.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवतो पावा, बाळानं उजळला
x x x रावांच्या वंशाचा दिवा.
७५.
जीवनाच्या प्रवासांत कधीं दुःखाचं ऊन्ह तर कधी सुखाचा पाऊस
x x x रावांचं नांव घेतें सासूबाईनीं केली मंगळागौरीची हौस.
७६.
कमळांत उभी लक्ष्मी, मोरावरची सरस्वति
x x x रावांचं नांव घेतें
x x x भाग्यवती.
७७.
भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री
x x x रावांचं नांव घेतें मंगळागौरीच्या रात्रीं.
७८.
गंगा यमुना सरस्वति येऊन मिळाल्या थेट, संसाराच्या सारीपाटावर
x x x न् x x x ची झाली भेट.
७९.
संसाररुपी सागरांत उसळल्या लाटा
x x x रावांच्या सुखदुःखांतमाझा अर्धा वाटा.
८०.
पाण्याचे हंडयावर फुलांचे झांकण
x x x रावाचे हातांत सोन्याचें कांकण.