मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|पंचतंत्र|मित्रभेद| गोष्ट बावीसावी मित्रभेद गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट चौथी गोष्ट पाचवी गोष्ट सहावी गोष्ट सातवी गोष्ट आठवी गोष्ट नववी गोष्ट दहावी गोष्ट अकरावी गोष्ट बारावी गोष्ट तेरावी गोष्ट चौदावी गोष्ट पंधरावी गोष्ट सोळावी गोष्ट सतरावी गोष्ट अठरावी गोष्ट एकोणिसावी गोष्ट वीसावी गोष्ट एकवीसावी गोष्ट बावीसावी गोष्ट तेवीसावी गोष्ट बावीसावी संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते. The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra. Tags : panchatantrastoryvishnu sharmaतात्पर्य कथापंचतंत्रविष्णुशर्मा गोष्ट बावीसावी Translation - भाषांतर गोष्ट बावीसावी मूर्खाला काम सांगावे व स्वतःवर संकट ओढवून घ्यावे. 'एका राजापाशी एक भलेमोठे वानर होते. त्याच्यावर त्याचा अतिशय जीव असल्यामुळे तो जिथे जाई, तिथे त्याला आपल्यासंगे नेई. एकदा दुपारच्या जेवणानंतर राजा झोपला असता, ते वानर त्याला पंख्याने वारा घालू लागले. तेवढ्यात एक माशी आली व राजाच्या छातीवर बसली. 'त्या वानराने तिला हाकलून द्यावे व तिने पुन्हा लगेच त्याच्या छातीवर येऊन बसावे, असे अनेक वेळा झाल्यावर, ते वानर तिच्यावर भलतेच चिडले. त्याने त्या माशीला ठार मारण्यासाठी जवळच असलेली नंगीतलवार हाती घेऊन, तिच्यावर एवढ्या जोराने प्रहार केला की, त्या एका घावासरशी त्या राजाचे दोन तुकडे झाले ! म्हणून ज्याला बरेच दिवस जगायचे असेल, त्याने मूर्खांच्या सहवासात कधीही राहू नये. 'दमनका, माझे तर ठाम मत आहे की, एक वेळ सुज्ञ शत्रू परवडला, पण मूर्ख अशा मित्राच्याच नव्हे, तर भावाच्याही वार्याला उभे राहू नये. ज्याने परक्या व्यापार्यांचे प्राण वाचविण्यासाठी आत्मबलिदान केले, त्या चोरट्या पण सूज्ञ ब्राह्मणाची गोष्ट माझ्या विधानाला पुष्टी देणारी आहे.' 'ती गोष्ट काय आहे बुवा?' असा प्रश्न दमनकाने मोठ्या उत्कंठाने विचारला असता करटक म्हणाला, 'त्याचं असं झालं- N/A References : N/A Last Updated : January 30, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP