मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहिणाबाईचे अभंग|
भ्रतारें वैराग्य घेतलीया ...

संत बहिणाबाईचे अभंग - भ्रतारें वैराग्य घेतलीया ...

संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या.तिनें आपले गुरु तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत सांगितली आहे. यामुळें या अभंगांना विशेष महत्त्व आहे.

Most of what we know of Bahina's life comes from her poetry. She composed 473 abhangas, brief devotional hymns in the Marathi language of Maharashtra. The first 116 of her songs narrate her present life and give a brief description of 12 previous lives; this part of her work is usually called her Atmanivedana, the story of her gradual complete self-dedication to Vishnu. In her 70s and preparing for her final death, Bahina told her story in verse to her son, who wrote it down.


भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥

वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥

भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥

भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥

चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥

भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥

बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥


N/A
Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP