संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ५

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '


पेंधा म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥
या रे नाचों अवघे जन । गावों हरिनाम कीर्तन ॥२॥
कान्हो पाठक बागडा । प्रेमे नाचे वैष्णवां पुढां ॥३॥

हा अभंग बाळक्रीडेतील आहे. या अभंगात पेंद्या आणि कृष्णाचा संवाद महाराज सांगतात गोपाळांचे कृष्णावर खूप प्रेम आहे.

“तुझी आण बाहीन गा देवराया । बहु आबडसी जीवा पासोनिया ॥”

गोपाळांचे जीवनच कृष्ण बनला होता. ते त्याचे अखंड ध्यान, चिंतन करीत होते.

“करीती नामाचें चिंतन । गडी कान्होंबाचे ध्यान ॥”

कृष्णालाही गोपाळ फार आवडायचे, तोही त्यांच्या शिवाय राहू शकत नव्हता.

“तुमची मज लागली सबे । ठायींचें नये नव्हों गडी ॥”

अशा प्रेमळ देवाचे वर्णन करावे असे पेंद्याला वाटले म्हणून तो कृष्णाला म्हणतो

पेंद्या म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥

हे इंन्द्रिय नियंत्या श्रीकृष्णा माझे आरुष अशुद्ध आणि बोबडे असे शब्द तूं ऐक.

म्हणून पेंद्यानें श्रीकृष्णाचे स्तवन केलेले आहे. प्रेमाने केलेली स्तुती देवाला फार आवडते. स्तवन झाल्यानंतर पेंद्या म्हणतो

या रे नाचों अबघे जन । गाव हरिनाम कीर्तन ॥२॥

आपण सगळे नाचू आणि हरिनाम कीर्तन गाऊ. सगळेच गोपाळ गातात आणि नाचतात.

देवही त्यांच्या बरोबर देहभान विसरून नाचू लागलेला आहे. ज्यांत देव आहे तो आनंद काही औरच असतो.

कान्होबा महाराज त्यामध्ये आहेत तेही उड्या मारतात आणि बागडतात.

कान्हो पाठक बागडा । नाचे वैष्णवां पुढां ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : August 22, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP