संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ३

कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले तर त्याचे दु:ख मानत नाहीत आणि जिवंत झाल्याचा आनंद मानत नाहीत ; म्हणूनच ते एका अभंगामध्ये म्हणतात , ' मरण माझे मरोनि गेले। मज केलें अमर। '


जरी तुज देवाची चाड । तरी न करीं बडबड । बहुत बोलतां वाड । पडसी पतनीं ॥१॥
जरीतुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा । वाद करितां निंदा । घडती दोष ॥२॥
जरी जरी जरी जरी तुज तुज तुज तुज देवाचा छंद । तरी सांडी कामक्रोध । तेणे परमानंद । होउनी ठासी ॥३॥
देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा । जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥
देवाचा सांगात । होतां अखंडित । तरी बैस पा निवांत । साधुगीं ॥५॥
देवाचा विश्वास । तरी हृदयीं धरी नागेश म्हणे कान्हो पाठक । अरे जना ॥६॥

हा अभंग केवळ साधकांकरीता आहे. साधन म्हणजे ज्याने या जीवनांत दुःखावर विजय मिळविण्याचा निश्चय करून त्याकरीता संताचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले आहे त्यांना महाराज सांगतात

जरी तुज देवाची चाड । तरी न करी बडबड | बहुत बोलतां बाड । पडसी पतनीं ॥१॥

तुला जर खरोखर भगवत्प्राप्तीची इच्छा असेल तर त्याचेच चिंतन कर, दुसरे कांही बडबडू नकोस “नको बोलो फार बैसो जनामधी । साबधान बुद्धी इन्द्रिय वमी ।” ” युक्त आहार विहार । नेम इन्द्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ बहु बोलणे ते सारा ।” जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधकांना अती बडबड करू नये असेच अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. विनाकारण बोलण्याचे अनेक तोटे होतात- १) आयुष्य व्यर्थ जाते “मोलाचे आयुष्य जाते वायाविण ।” २)खोटे बोलले जाते. ३)निंदा होण्याची शक्यता असते. ४)चित्त विक्षिप्त होते. म्हणून विनाकारण फार बोलू नये. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात-भगवत्प्राप्तीची इच्छा असेल तर वादविवाद करू नकोस. “तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥” त्यामध्ये दोष घडण्याची शक्यता असते.
जरी तुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा । वाद करितां निंदा । घडती दोष ॥२॥
जरी तुज देवाचा छंद । तरी सांडी कामक्रोध । तेणे परमानंद । होउनी ठासी ॥३॥

तिसऱ्या चरणांत कान्होबा महाराज सांगतात की, जर तुला देवाच्या प्राप्तीचा छंद लागला आहे तर तू काम क्रोधांचा त्याग कर काम क्रोध हे आनंदाच्या प्राप्तीतील महान प्रतिबंधक आहेत. “काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा बिद्ध्येनमिह वैरिणम् ॥३॥३७॥” “बिहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥२॥७१॥” त्यातून जो साधक मुक्त होतो तो आनंदाच्या साम्राज्यावर अभिषिक्त होऊन राज्य करतो. “हे अंतरीहूनी जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निबटले । जैसे रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ तैसे राग द्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥३॥७०,७१॥ “

जरी तुज देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा ।
जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥

तेव्हां जर खरोखर तुला देव मिळावा असे वाटत असेल तर मौन धारण करून भगवचिंतन कर त्या अभ्यासानें अनन्यता प्राप्त होऊन तुला भगवत्स्वरूपाचा अनुभव येईल.
जरी तुज देवाचा सांगात । होतां अखंडित । तरी बैस पा निवांत । साधुसंगीं ॥५॥

जर तुला देवाच्या अखंड संगतीची इच्छा असेल तर सत्संगामध्ये स्थिर चित्त करून बैस.
जरी तुज देवाचा विश्वास । तरी हृदयीं धरी नागेश । म्हणे कान्हो पाठक । अरे जना ॥६॥

सत्संग हा भगवत्संगच आहे. त्यामुळे देवाविषयीचा विश्वास दृढ होईल. त्या विश्वासानें तूं अंतरंगातील नागेशाला (देवाला) धर. म्हणजे तुझी पारमार्थीक साधना पूर्ण होईल.

N/A

References : N/A
Last Updated : August 22, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP