मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|आनंदामृत| प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग आनंदामृत प्रकरण पहिले – श्रीगणेश शारदा प्रकरण दुसरे – श्रीसद्गुरु-स्वरूप प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग प्रकरण चौथे – पंचमुद्रा-साधन प्रकरण पाचवे – हठयोग-साधन प्रकरण सहावे – अजपाजप प्रकरण सातवे – षड्चक्र दर्शन प्रकरण आठवे – सद्गुरु कृपा प्रकरण नववे – मानस पूजा (ध्यान) प्रकरण दहावे – सद्गुरु लक्षणे प्रकरण अकरावे – भविष्य-दर्शन प्रकरण बारावे – अध्यात्मसाधन प्रकरण तेरावे – आत्म दर्शन प्रकरण चौदावे – अद्वैतानुभव प्रकरण पंधरावे – आत्म-निवेदन प्रकरण सोळावे – अंतिम-कथन प्रकरण सतरावे – उद्धव-बोध प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग सर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा, अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा, स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज. Tags : anandamrutsanttukadojiआनंदामृततुकडोजीसंत प्रकरण तिसरे – मोक्ष सुखाचा मार्ग Translation - भाषांतर श्रोती व्हावे सावधान । लक्षी घ्यावे बोबडे वचन ।सर्व तुम्ही साधुजन। म्हणोनि तुम्हां विनवीत ॥१॥प्रथम करा सोपा उपाय । जेणे प्रपंचातचि मुक्त होय ।फिटे चौयांशीचे भय। ग्रहण करिता अर्थ याचा ॥२॥नको नकोत काही साधने। नको नको पहाडी राहणे ।नको संसार तोहि सोडणे । भक्तिरूप उपाय तो ॥३॥असोनि खुळा पांगळा । जो का उपाधी वेगळा।असेल प्रपंचहि आगळा। तरी चालतले यालागी ॥४॥कित्येक बोलती ब्रह्मज्ञान । शास्त्रपुराणे पठन करून ।म्हणती पाहू पाहू ब्रह्मखूण। दावू लोका सर्वहि ॥५॥रश्मीची ज्योति लावा। मग तिकडे दृष्टि फिरवा।बह्ममणि दिसतो रे हिरवा। पाहा पहले एक दृष्टी ॥६।ज्यासी आहे स्पष्ट दृष्टि । तो पाही दीप्ति गोमटी।बिचारा आंधळा अंधदृष्टी। काय जाणे? ||७||तयाने काय साधने करावी? ब्रह्मज्योति कैसी पाहावी?म्हणोनि सर्वचि खरी मानावी। करावे दृढ ते एकचि ॥८॥ब्रह्म काय दृष्टीने दिसे? आणि दिसे तितुके नाशे ।ब्रह्म काय अंधाजवळी नसे? चराचरी व्यापक जे ॥९॥जंव शुद्ध ज्ञानमार्ग न जाणला। कि भक्तिपंथे न गेला।तोंवरी तया प्राण्याला। मुक्ति मिळेल कैंची? ॥१०॥*अहं ब्रह्मास्मि* शब्द एक । तेथे जया न लाभे ऐक्य ॥तो प्राणी जन्ममरण-शोक । सोडील केवि? ||११ ॥जंव *तत्पद* पाहोनि *त्वंपद* शोधील। *असि* पदाचा मार्ग साधील ।तंवचि मोक्षमार्ग लाभेल । हे तू सत्य जाण पा ॥१२ ॥नेम धर्म अनुष्ठान । यांनी होशील जरी पावन ।तरी मोक्षास आत्मज्ञान। पाहिजे गड्या! ॥१३ ॥जंव सोडूनिया प्रवृत्ति। धरिशी दृढ भावे निवृत्ति ।जरी होशील लीन संती। तरी ज्ञानदृष्टि देई तो ॥१४॥श्रवण मननाचेनि योगे। निजध्यास लागे वेगे।मग साक्षात्कार भोगे । तंववरी मुक्ति मिळेना ॥१५॥वैखरी मध्यमा पश्यंति पर। हे वेदांचे जाण घर ।चार वाचा तीच नार। वरी प्रेमनिर्झर सत्रावी ॥१६॥पडे शुद्ध प्रेमकिरण जयावरी। अमृत वाचा पाझरी।प्रगट ती वेदशब्द सत्य अवधारी। न ढळती बापारे! ॥१७॥तया शब्दे जीव-शिव होती एक। मुळीचे ठावे पडे देख।गंगाजळी टाकिता मलीनोदक । गंगारूप होतसे ॥१८॥जरी करिशी यज्ञ अन्नदान । तरी मिळती स्वर्गादि भोग पूर्ण।पुण्य सरलिया तेथून। उतरे भोगाया मृत्युलोकी ॥१९॥म्हणू नि तूं ऐसे न करी। सांगती संत ते अवधारी।लक्ष ठेवी पुरा-पुरी। माझिया बोला ॥२०॥इतिश्री आनंदामृत ग्रंथे। वेदान्तसार संमते।तुकड्यादास विरचिते । तृतीय प्रकरण संपूर्णम् ॥३॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP