मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत एकनाथांचीं भजनें| भाव-दशा संत एकनाथांचीं भजनें अनुक्रमणिका संत एकनाथांचे चरित्र मनुष्यदेहाचे सार्थक स्वधर्माचरणाचे अगत्य निष्काम कर्म-योग मिथ्या साधनांच्या मागे लागु नका सार-ग्राही श्रवण पाहिजे अहिंसा-सत्यादी व्रते निष्ठेने पाळावी टाकावयाच्या गोष्टी : अविश्वास, अभिमान ममत्व जगात वागतांना घ्यावयाची काळजी मनोजय नादमाधुर्य नाम-माहात्म्य एकनाथांचा परिपाठ कीर्तन देवास प्रिय, कीर्तनाने सामाजिक चित्त-शुध्दि संतांची लक्षणें संतसंगतीचा एकनाथांस आलेला अनुभव परमेश्वर-स्तवन भक्ताचा संकल्प सगुण साक्षात्कार भक्तीचे स्वरूप आणि गौरव देव-भक्ताचे प्रेम (नाथांच्या मुखाने) भाव-दशा ब्रह्मनिष्ठांची लक्षणे आत्म-साक्षात्कार सर्वत्र देवदर्शन ज्ञोनोत्तर जीवन भाव-दशा संत एकनाथांनी सामान्यजनांना तसेच भक्तजनांना परमार्थाच्या सहजसुलभ वाटा दाखवून मार्गदर्शन केले आहे. Tags : bhajanekanathasantएकनाथभजनसंत भाव-दशा Translation - भाषांतर २३३एका देहा माजीं दोघे पै बसची । एकासी बंधन एका मुक्तगतिपहा हो समर्थ करी तैसे होय । कोण त्यासी पाहे वक्र -दृष्टिपाप पुण्य दोन्ही भोगावी एका हातीं ।ऐसी आहे गति अतर्क्य तेएका जनार्दनी जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावेंभावार्थएकाच देहामध्यें जिवात्मा आणि शिवात्मा दोन्हीं वसत असतात. जिवातम्याला जन्म, मृत्युचे बंधन असते तर शिवात्मा मुक्त आहे. त्याच्या कडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. शिवात्मा सामर्थशाली असून तो करील तसेच घडते. पाप आणि पुण्य दोन्ही जिवाला भोगावी लागतात. कर्मगती माणसाच्या तर्क शक्तीच्या पलिकडे आहे. एका जनार्दनी म्हणतात, शिवशक्ती अतर्क्य आहे या शक्तीला सर्वभावे वंदन करावें. २३४सात्विका भरणे रोमांसी दाटणें । स्वेदाचे जीवन येऊन लागेकांदे तो थरारी स्वरूप देखे नेत्रीं । अश्रु त्या भीतरीं वाहतातीआनंद होय पोटी स्तब्ध झाला कंठी ।मौन वाक्-पुटीधरुनीराहेटाकी श्वासोच्छ्वास अश्रुभाव देवा । जिरवून एका स्वरुप होयएका जनार्दनी ऐसे अष्टभाव । उत्पन्न होतां देव कृपा करीभावार्थअंगावर शहारे येणे, स्वाद (घाम फुटणे), शरिराला कंप सुटणे, डोळे अश्रुंनी डबडबणे, कंठ गद्गदणें, शब्द कुंठित होणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढणे, स्वरुप दर्शनाने अंत:करण आनंदाने भरून जाणे हे अष्ट-सात्विक भाव आहेत असे सांगून एका जनार्दनी म्हणतात, स्वरुपाशी एकरुप झाल्यावर या सात्विक भावांचा अनुभव येतो, तेव्हां देवाची कृपा होते. २३५सहज सहज ऐशा करिताती गोष्टीपरि सहजाची भेटी विरळा जाणेसहजाची आवडी विद्या अविद्या तोडीजाणीव-नेणीवेची राहूं नेदी बेडीजाणीवा जाणपण नेणीवा नेणपणदोहींच्या विंदानें सहजाचे दर्शनएका जनार्दनी जाणीव ना नेणीवसहज चैतन्यासी देउनि ठेला खेंवभावार्थअध्यात्मिक अनुभवांत परमेश्वर भेटीच्या अनेक कथा सांगितल्या जातात परंतू ईश्वर भेटीचे रहस्य एखादाच जाणतो. परमेश्वर कृपेची ओढ निर्माण झालेल्या साधकाचे ज्ञान, अज्ञान, जाणीव, नेणीव यांच्या बेड्या आपोआपच तुटून पडतात. असा साधक जाणीव आणि नेणिवेच्या कक्षा ओलांडून पलीकडे जातो आणि प्रत्यक्ष चैतन्याला मिठी घालतो. हा अनुभव विरळा च असतो. २३६मीतू ऐसी परी । जैसे तरंग सागरींदोहीं माजी एक जाणा । कृष्ण द्वारकेचा राणातंतु वस्त्र दोन्ही एक । तैसें जयासी व्यापकदेव भक्त ऐसी बोली ।भ्रांती निरसेनासी झालीएका जनार्दनी कृपा । भ्रांति कैसी जगीं पहा पांभावार्थसमुद्रावर लाटांचे तरंग उठतात तसेच चित्तात मी-तूं पणाचे तरंग उमटतात. सागरावरचे तरंग जसे पाण्याचे असतात तसेच मनावर उमटणारे तरंग एकाच श्रीकृष्ण रुपी परम तत्वा पासून निर्माण झाले आहेत. तंतू पासून विणलेलें वस्त्र आणि तंतु जसे एकरुप असतात तसेच विश्व आणि विश्वाला प्रकाशित करणारा परमात्मा एकच आहेत हे जाणून घ्यावे म्हणजे देव आणि भक्त भिन्न आहेत या भ्रांतिचे निरसन होईल. एका जनार्दनी म्हणतात, परमेश्वरी कृपेने च या भ्रांतिचे निरसन होते. N/A References : N/A Last Updated : April 01, 2025 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP