नाथपरंपरेच्या वाड्मयाचा वारसा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


उपरिनिर्दिष्ट संस्कृत-प्राकृत वाड्‍मयाचा प्रगाढ व्यासंग जसा नाथलीलामृतांत प्रकटलेला दिसतो. तसाच नाथपरंपरेच्या वाड्‍मयाचा वारसाही समर्थपणे सांभाळलेला दिसतो. नाथपरंपरा ही योग्यांची परंपरा आहे. आदिनाथांनी नाथपूर्वकालीन पातंजलयोगसूत्रांपासून हठयोगप्रदीपिकेपर्यंत (५.११) योग ग्रंथांची दखल घेतली आहे. गुरु गोरक्षनाथ हे नाथमालिकेंतले कौस्तुभमणि. त्यांच्या ग्रंथांचा आदिनाथांनी जिव्हाळयानें अभ्यास करावा, हें स्वाभाविकच आहे. सिध्दसिध्दान्तपद्धति, अमनस्कयोग  ( २.२.१४, ३.२२२ ), विवेकमार्तंड ( ४.१९ ) ’ गोरक्षशतक ’ (४.२० ), गोरक्षबोध ( ४.१७१), इत्यादि गोरक्षनाथांच्या ग्रंथांचा तर त्यांनी साक्षात्‍ उपयोग केला आहे. गुरुगीता (२.१७५ ), केदारकल्प ( २.१७५ ), गुरुकल्पखंड (२.२१४), मत्स्येंद्रसंहिता (४.३८), हे नाथपरंपरेला प्रिय असणारे ग्रंथही त्यांनी साक्षेपानें वापरले आहेत.

मासामाजू मार्गशीर्षमास । शुध्दपक्ष गुरुवारास । श्रवणनक्षत्र निशीं माध्यान्हास । मत्स्येंद्रनाथ अवतरले ॥ (२.१२५) ही मत्स्येंद्रनाथांची जन्मवेळ आणि तिसर्‍या अध्यायांत ( ओ. १६६ नंतर ) दोन संस्कृत श्लोकांत नोंदविलेली गोरक्षनाथांची जन्मवेळ, यांना कुठल्या तरी महत्त्वपूर्ण सांप्रदायिक सामग्रीचा आधार दिसतो. दुसरा आणि तिसरा हे दोन अध्याय तर
त्यांनी सांप्रदायिक ग्रंथांच्या भरीव पायावरच उभे केले आहेत:

सिध्दसिध्दामृत ग्रंथीं । तेचि धरोनि सत्संगति । आदिनाथलीलामृतीं । यथामति अनुवादे ॥
अमनस्कंग्रंथ सारांश । वामदेवा कथिती महेश । गुरुकल्पखंडींचा इतिहास । उभयाध्यायीं कथियेला ॥ (३.२२१-२२२)

N/A

References : N/A
Last Updated : February 06, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP