भजनावली - इतर अभंग

भजनाचे सांप्रदाय - एक रामदासी सांप्रदाय आणि दुसरा वारकरी सांप्रदाय.


छंद लागला हरिचा मजला नीही आणिक धंदा ग
अंतर्यामी नित्य पूजिते आनंदाच्या कंदा ग ॥धृ०॥
जप तप करिता योगि यांना नाहीं गवसला गोपाळू ।
ह्र्दयी घ्यावा अंतरि माझ्या प्रगट जाहला घननीळू ।
हरी नामाविण वदन न बोले शब्द अन्यथा वाया ग ।
कर्ण एकती नाम तयाचे पुलकित होते काया ग ॥२॥
चरण चालती मंदिरि त्याच्या नेत्र पाहति गोविंदू ।
कर हे रमती सेवेमाजी त्यांत जिवाला आनंदु ॥३॥
नयन पाकळया लववुनी खाली साठविते या लोचनी ग ।
परमानंदू काय कथावा अक्षय रमता उन्मनी ग ॥४॥
नको जगाचे हेवे दावे व्यर्थ काळ ज्या मानसी ग ।
लयास जाती चिंता सार्‍या हरिची होता दासी ग ॥५॥

११९ अभंग
केला सितापतीला मित्र । तेणे देह होईल पवित्र ।
वरकड भिंतीवरले चित्र का भुललासी ॥धृ०॥

जोवरी असेल सकारुका । तोवरी जमतील मामा काका ।
अंतःकाळी राम सखा । का भुललासी ॥१॥

जोवरी धन संपत्तीचे वारे । तोवरी जमतील पोरे सारे
अंतःकाळी राम रघुवीरे ॥ का भुललासी ॥२॥

चित्र काढिले भिंतो भिंती । सारुनी पाहता एकच माती  
ऐशी संसाराची गती । का भुललासी ॥३॥

अवघड संसाराचा घाट । धरी बा मोक्षपदाची वाट
वरती श्रीरामाचा थाट । का भुललासी ॥४॥

१२० अभंग
व्यर्थ व्यर्थ गेला जन्म । काय केले बा साधन ॥धृ०॥
इंद्रियांचे पुरविले लाड । नाही सतसंगाची जोड ॥
नाही सुचिता शुध्दता । दुर सारिले अनंता ॥
आता तरी जागा होई । शरण विठ्ठ्लासी जाई ॥
महापापी उध्दरील । नाही कोणा उपेक्षीले ॥
तोची तारील तुजला । मार्ग भक्तीचा चांगला ॥

१२१ अभंग
देवऋणी झाला सुभद्रापतीचा
महिमा भक्तिचा वर्णीयेला
गीता अमृताचा कलश भरोनी
पार्थासी देऊनी कर्म केले ॥धृ०॥

ॐ नमो भगवते वासुदेवाय । हरये परमात्मने ।
प्रणतः क्लेश नाशाय । गोविंदाय नमो नमः

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP