मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|भागवतमाहात्म्य| अध्याय १ ला भागवतमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा भागवतमाहात्म्याचा सारांश भागवतमाहात्म्य - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत भागवतमाहात्म्य - अध्याय १ ला Translation - भाषांतर १नमो वासुदेवा देवा । सर्व ऐश्वर्याचा ठेवा ॥१॥सच्चिदानंदस्वरुपा । अखिल विश्वाचिया बापा ॥२॥त्रिविधतापनिवारणा । नमन असो तुजसी कृष्णा ॥३॥सर्बभूतहृदयासी । वंदूं आतां शुकदेवासी ॥४॥पूर्वाचार्यांसी स्मरुनि । प्रवर्तावें पुण्यकर्मीं ॥५॥महत्कार्यसिद्धीस्तव । सकलां वंदी वासुदेव ॥६॥२कथामृतास्वादकुशल शौनक । नैमिषारण्यांत सूतांलागीं ॥१॥वंदूनियां, म्हणे अज्ञाननाशका । ज्ञानप्रकाशका सूतश्रेष्ठा ॥२॥पवित्र जे कर्णरसायनरुप । भक्तिज्ञानयुक्त विवेकासी ॥३॥वाढवील, तेचि कथा मज कथीं । मायामोहाप्रति नाशील जे ॥४॥वासुदेव म्हणे शौनक सूतासी । वाट कल्याणाची पुशिती प्रेमें ॥५॥३या युगीं बव्हंशी जन हे असुर । तयांचा उद्धार कैसा व्हावा ॥१॥श्रेयाचें जें श्रेय पावनापावन । होई नारायणकृपा जेणें ॥२॥सूत म्हणे कालव्याल मुखांतूनि । वांचवील झणी भागवत ॥३॥शुक्तोक्त या शास्त्रावीण कलीमाजी । साधन जनांसी अन्य नसे ॥४॥अनंतजन्मीचें पुण्य फळा येई । सुलभ तैं होई भागवत ॥५॥वासुदेव म्हणे अमृतासी तुच्छ । लेखूनि विबुध ऐकती हें ॥६॥४कोठें भागवत कोठें तें अमृत । हिरा आणि कांच एक केंवी ॥१॥अमृतमोलेंही देवांसी न लाभे । केवळ भक्तांतें प्राप्त होई ॥२॥परिक्षितिमोक्षें विस्मयें तो ब्रह्मा । करुनि तुलना हर्ष पावे ॥३॥सकल साधनांमाजी हें वरिष्ठ । पाहूनि विस्मित ऋषि-मुनि ॥४॥कलिमाजी साक्षात् हेंचि कृष्णरुप । पठणें वैकुंठ श्रवणें किंवा ॥५॥सप्ताहश्रवणें होई मोक्षप्राप्ति । वासुदेव चित्तीं हर्ष पावे ॥६॥५सूत म्हणे मुनि सनकादि, शौनका । पातले एकदां हिमाचलीं ॥१॥सत्संगार्थ गेले बदरिकाश्रमीं । पाहिलें त्या स्थानीं नारदासी ॥२॥बोलले तयासी कां रे खिन्न ऐसा । द्रव्यनाशें जैसा प्रापंचिक ॥३॥मुनि म्हणे भूमि मानूनि पवित्र । हिंडलों सर्वत्र अत्यादरें ॥४॥पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी । गेलों रामेश्वरीं परी व्यर्थ ॥५॥घोर कलीनें या व्यापिली धरणी । धर्म सत्य जनीं न दिसे दया ॥६॥वासुदेव म्हणे तप, शौच, दान । माजतां अधर्म केंवी घडे ॥७॥६केवळ उदरंभरणार्थी जन । कपट भाषण करिती क्षुद्र ॥१॥मंदमती मंदभाग्य ते पाखंडी । शालक जयांसी बुद्धिदाता ॥२॥तरुणीप्रभुत्व सदनीं जयांच्या । विक्रय कन्येचा करिती घोर ॥३॥यवनक्रांत तीं झालीं पुण्यस्थानें । देवतायतनें भ्रष्ट होती ॥४॥अन्नविक्रयी ते होती सर्व जन । वेदांसी ब्राह्मण विकिती हाय ॥५॥शीलाचा विक्रय करिती कामिनी । खिन्न होई मनीं वासुदेव ॥६॥७अवलोकूनियां क्रीडा हे कलीची । यमुनातीरासी प्राप्त झालों ॥१॥पाहिली त्या स्थानीं सुंदर युवती । निश्चेष्ट पुढती वृद्ध दोन ॥२॥घालूनियां वारा सांत्वन तियेचें । करिती मृदुशब्दें दासी बहु ॥३॥कुतुहलें गेलों तियेच्या सन्निध । पाहूनियां मज वदली बाला ॥४॥नारदा, भाग्येचिं साधूंचें दर्शन । दु:खनिवारण करीं माझें ॥५॥नाम माझें भक्ति; ज्ञान, वैराग्य हे । पुत्र दोन माझे क्षीण झाले ॥६॥वासुदेव म्हणे प्रभाव कलीचा । युवती ते माता, वृद्ध बाळें ॥७॥८कलिसंसर्गे हे वृद्ध झाले पुत्र । दासी सेवारत महानद्या - ॥१॥देवही मजसी साह्य होतां शांति । न लाभे चित्तासी काय करुं ॥२॥द्रविडदेशीं मी उप्तन्न जाहलें । आनंदें वाढलें कर्नाटकीं ॥३॥क्वचित्संगोपन झालें महाराष्ट्रीं । जाहलें गुर्जरीं जीर्ण अंग ॥४॥यौवन लाभलें यमुनातीरासी । क्षीणत्व पुत्रांसी आलें परी ॥५॥आतां कैसा तरी सोडावा हा देश । नारदा, न मार्ग गवसे कांहीं ॥६॥वासुदेव म्हणे नारद ‘भक्तीसी’ प्रेमें धीर देती संकटीं त्या ॥७॥९नारद तियेसी म्हणे नारायण । करील कल्याण भिऊं नको ॥१॥दारुण हा कलि, लोपलें सत्कर्म । योग, जप, ध्यान न करी कोणी ॥२॥दुष्कर्मनिरत पावती आनंद । पावताती खेद संत सदा ॥३॥राहिला न कोठें पुण्यकर्मलेश । पृथ्वी भारभूत शेषाप्रती ॥४॥मंगलकर्माचें न घडे दर्शन । वार्धक्य हें जाण तेणें पुत्रां ॥५॥वृंदावनीं निद्रा लाभली यांप्रती । लाभेल एथेंचि सौख्य तुज ॥६॥यद्यपि न भोक्ते, द्वेष्टेही न तरी । यास्तव अंतरीं आशा बहु ॥७॥वासुदेव म्हणे सनकादिकांसी । नारद कथिती ऐसें वृत्त ॥८॥१०भक्ति म्हणे केंवी परीक्षिती नृपें । रक्षिलें कलीतें मुने, कथीं ॥१॥मुनि म्हणे यदा मुकुंदें भूमीसी । त्यागिलें, कलीसी हर्ष तदा ॥२॥परीक्षिति त्याच्या उद्युक्त नाशासी । शरण तयासी जाई कलि ॥३॥कलियुगीं एक केशवकीर्तन । अमोघ साधन सकलांप्रती ॥४॥कुकुर्मे पदार्थ जाहले नि:सार । कथा हे नि:सार कणलोभें ॥५॥नास्तिकसंसर्गे तीर्थेही नि:सार । तपही नि:सार कामक्रोधें ॥६॥असंयम अनभ्यास तैं पाखंड । तेणें ध्यानयोग नि:सार तो ॥७॥वासुदेव म्हणे कलीचा संसर्ग । उच्छिन्न हे मार्गं करी ऐसे ॥८॥११पंडित महिषासमान लंपट । मोक्षमार्गी दक्ष असतीचिना ॥१॥शुद्ध संप्रदाय न उरे भक्तीचा । प्रभाव कलीचा ऐसा असे ॥२॥दोष मग द्यावा कोणासी म्हणोनि । निकट असोनि साही देव ॥३॥भक्ति म्हणे धन्य धन्य तूं नारद । नित्य सिद्धिप्रद संतभेटी ॥४॥स्वल्पही त्वद्वच पाळितां कल्याण । लाभे अढळस्थान ध्रुवाप्रति ॥५॥ऐशा हे नारदा, वंदन तुजसी । वासुदेव कथी प्रथमाध्याय ॥६॥ N/A References : N/A Last Updated : October 31, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP