अथतिलघुक्रियाप्रस्तारे श्लोकसूत्रम्
वृत्त म्हणजे कांहीं नियमित अक्षरांत लघु- गुरुंची विशिष्ट क्रमानें रचना करुन दाखविणें.
पादार्णगुरुषु प्राग् ग्लौ व्द्यादिषु व्दिगुणोत्तरा: ।
प्रस्तारभेदसंख्या स्यात् सर्वलघ्वधिर्विधि : ॥
आतां प्रस्तार थोडक्यांत कसा मांडावा याविषीं व प्रस्तारांतील प्रकारांची संख्या कशी काढावी, याविषयीं ‘ पादार्णगुरुषु ’ या श्लोकसूत्रानें जोशीबुवा सांगतात. या ठिकाणी ‘ श्लोकसूत्रम् ’ असें म्हटलें आहे. व पूर्वींही एके ठिकाणी ‘ मत्कृतं सूत्रम् ’ असे म्हटलें आहे. त्यावरुन जोशीबुवांनीं ही जी प्रस्तारादिकाविषयीं लक्षणें केली आहेत, ती फार संक्षेपरुपानें केली आहेत असें सिध्द होते. संक्षेपरुपानें जे नियम केलेले असतात त्यांसच सूत्र असें म्हणतात. सूत्रांचा अर्थ करिते वेळीं प्रस्तुतोपयोगी मजकुराचा अध्याहार करुन प्रस्तुतार्थ स्पष्ट करावयाचा असतो व याप्रमाणें खंडमेरु, सुमेरु यांच्या विवेचनच्या वेळी काहीं मजकुराचा अध्याहार करुन, प्रस्तुत जी प्रस्तारसंख्या ती कशी निघते हें दाखविलें आहे. येथेंही असाच कांही मजकूर बाहेरचा घेऊन अर्थ बसवावा लागतो. असो. आतां आपण या श्लोकसूत्राचा अर्थ करुं. श्लोकाच्या चरणांतील गुरुंमध्ये ( यावरुन प्रथम चरणांत सर्व गुरु मांडावेत, हें सूचित होते. ) प्रथम गुरु, लघु या क्रमानें ते मांडावेत. ( हा मांडण्याचा क्रम वृत्तरत्नाकरांतील प्रस्तार मांडण्याची जी माहिती पूर्वी दिली आहे त्याप्रमाणेंच आहे असें समजावें. ) याप्रमाणें मांडिलें असतां एकाक्षरांचे प्रकार, गुरु, लघु या रुपानें दोन होतात. हेच प्रकार व्दिगुणित करीत गेलें असतां ते पुढील संख्यात्मक अक्षरांचे प्रकार होतात. म्हणजे दोन अक्षरांचा प्रस्तार चार, तीन अक्षरांचा आठ, चार अक्षरांचा सोळा असे होतात, असें समजावें. याप्रमाणें प्रस्तारांतील प्रकारांची संख्या समजते . हा प्रस्तार गुरु - लघुंच्या चिन्हांनी मांडीत गेलें असतां याचा आरंभ प्रथम सर्वगुरुंपासून होतो, व सर्वलघु ज्यांत येतात अशा प्रकारांत याची समाप्ति होते. ‘ सर्वलध्वविर्विधि: ’ या पदानें जोशीबुवांनी हाच अर्थ ध्वनित केला आहे. एकंदरीत या श्लोकाचा तात्पयार्थ असा निघतो कीं, प्रस्तार मांडावयाचा असेल तर प्रथम सर्व गुरु मांडावेत. पुढें गुरु, लघु मांडण्याची जी प्रसिध्द प्रध्दति आहे त्याप्रमाणें मांडीत जावें. या मांडण्याच्या क्रमाचा अबधि सर्वलघु ज्या प्रकारांत येतात तेथें येतात तेथें होतो, असें समजावें. एकाक्षराच्या प्रस्ताराची संख्या होते. याप्रमाणें पूर्वीच्या अक्षरसंख्येच्या प्रस्ताराची येणारी संख्या होते. याप्रमाणें पूर्वींच्या अक्षरसंख्येच्या प्रस्ताराची येणारी संख्या व्दिगुणित केली. म्हणजे ती त्याच्या पुढच्या अक्षरसंख्येची प्रस्तारसंख्या होते, असें समजावें. याप्रमाणें प्रस्तार मांडण्यासंबधानें व त्याच्या प्रकाराच्या संख्येसंबंधानें जोशीबुवांनी वरील श्लोकांत संक्षेपानें सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : March 05, 2018
TOP