अर्धसमवृत्तें - १६१ ते १६५
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
वसुमती : - ( त्सौचेव्दसुमती ) जाणा वसुमती । तासागणवती ।
तो वीर सकला । मारी रिपुकुला ।
जीवें वसुमत । पाळी वसुमती ॥१६१॥
==
मदलेखा : - ( म्सौ ग : स्यान्मदलेखा ) : -
मासांगीं मदलेखा । होते हें मनिं लेखा ॥
जो नाही ॠतु आला । तों कैचीं विटपाला ।
काळें येइल देखा । निर्यासे मदलेखा ॥१६२॥
==
मधुमती : - ( मधुमति ननगा: ) : मधुमति ननगीं ।
अज रमणि नवी । हरि तुज विनवी ।
रम तिशि शुभ ती । अधर मधुमती ॥१६३॥
==
मनोरमा: - ( नरजगैर्भन्मनोरमा ) : - नरजगीं घडे मनोरमा ।
नमन राघवा जरी करी । भवसमुद्र तो तरे तरी ।
अनुभवी समस्तही क्षमा । वधु मिळे तया मनोरमा ॥१६४॥
==
मंजुभाषिणी: - ( सजसा जगौ भवति मंजुभाषिणी )
सजसाजगीं घडल मंजुभाषिणी ।
हरिवांचुनी घडिभरी घरीं नसे ।
भुलली तया सतत काय मानसें ॥
परपुरुषी रति सदेह पोषिणी ।
म्हणतां कशी गरिब मंजुभाषिणी ॥१६५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP