अर्धसमवृत्तें - १५४ ते १६०

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.



आख्यानकी : -
आख्यानकी तौ जगुरुगओजें । जतावनोजे जगुरु गुरुश्चेत्‍ ॥
आख्यानकी तातजगाग यांनीं । पादीम व्दीतीयीं जतजागगांनीं ॥
तो गांजिता भक्त जनासअ येतो ।
जिणोन त्यां दुष्ट जनां वधे तो ॥
आख्यान की होय कदा न काचें ।
वदेन मी त्या सुखदायकाचें ॥१५४॥
==
विषरीताख्यानकी : -
जतौ जगौ विषमे समे चेत्‍ ।
तौ ज्गौ ग एषा विपरीतपूर्वा: -
जताजगार्गी विषमीं समीं बा ।
जनास तो या भजनास सांगे ।
तैसा न तो कीम वदणार आंगे ॥
वदे तसें नाचरितां तयाचें ।
आख्यान करी हे विपरीत साचें ॥१५५॥
==
पुष्पिताग्रा: - अयुजिनयुगरफेतो यकारो
युजि च नजौ जरगाश्च पुष्पिताग्रा ।
विषमपदिं ननारयीं समग्रा ।
समिंच नजाजरगांनिं पुष्पिताग्रा ॥
विषमपदिं ननारयीं समग्रा ।
समिंच नजाजरगांनि पुष्पिताग्रा ।
नृपजननगरींत सोय पाहा । नृपभजना त्यजुनी घरी न राहा ।
नगींरहि विजना दिसे समग्रा । ध्वजशिखरा लतिकेव पुष्पिताग्रा ॥१५६॥
निजजनमनिं राहि तोयदाभ । निरखि जिला व्रजराज रुक्मदाभ ।
प्रियसखि सह गोपिका समग्रा । कनकलता मणि मूर्ध्रि पुष्पिताग्रा ॥१५७॥
निरखुनि पथि रंगरायपादें । नत भजका निजलाभ रोकडा दे ।
निघति पुलिनिं गोपिका समग्रा । परतील लाजुनि येक पुष्पिताग्रा ॥१५८॥
==
विषमवृत्तम् .
श्रीहरी रविसुतातटिं पाहे
अणितो सखये करि कृपां हे ।
भक्तालागीं शीघ्र येतों म्हणाला ।
दावीं मजसी आठवीं तद्‍ गुणाला ।
पिंगलें कथिलें नाहीं अन्यग्रंथांत आसती ।
ते श्लोक देशभाषेनें लिहितों गोड भासती ॥१५९॥
==
शशिवदना: - ( शशिवदना न्यौ ) शशिवदना ती । नयगणिं होती ॥
कुवलयनेत्रा । परमपवित्रा ।
स्तविलि जनांहीं । शशिवदना ही ॥१६०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP