केशवस्वामी - पद ३
केशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.
पाहाणें न पाहाणॆं । राहिलें पाहाणॆं ।
डोळ्यांसि देखणें डोळयांनी केवी ?
पाहाणें न पाहाणें । नुरे आत्मदर्शनें ।
यालागीं बोलणें ‘नेती नेती’ ॥ध्रुवपद. ॥
सद्रुरुकृपा झाली । निज वस्तु देखिली ।
कल्पनेची मोडली समूळ वाट ।
हरपला देहभाव । संकल्पा कैंचा ठाव ? ।
स्वरुपाचा अनुभव निजबोधें ॥पाहाणें न० ॥१॥
जें स्थूल ना सुक्ष्म नव्हे । जेथें सर्व सामावे ।
तें रुप जाणावें कैसेंनि आतां ।
परा पारुषली । प्रमाणें अप्रमाणें झाली ।
दृष्टांतें वाहिली द्यावया आण ॥पाहाणे न ०॥२॥
सत् सदत्वीं गेलें । चिदीं चित् पण ठेले ।
आनंद सामावला आनंदामाजी ।
ऐसिया निज दृष्टीं । सहजीं सहज होतसे वृष्टी ।
केशवीं होय आनंद कोंदला पाठिं पोटीं ॥पाहाणें न०॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2018
TOP