संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|पुस्तकं|शिवभारत| अध्याय बत्तिसावा शिवभारत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेवीसावा अध्याय चोविसावा अध्याय पंचविसावा अध्याय सव्विसावा अध्याय सत्ताविसावा अध्याय अठ्ठाविसावा अध्याय एकोणतिसावा अध्याय तिसावा अध्याय एकतिसावा अध्याय बत्तिसावा शिवभारत - अध्याय बत्तिसावा श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून लिहिलेलें कवीन्द्र परमानन्दकृत ' श्रीशिवभारत ' Tags : paramanandshivabharatshivajiपरमानन्दशिवभारतशिवाजी अध्याय बत्तिसावा Translation - भाषांतर कवींद्र म्हणाला :- नंतर शिवाजीनें जुना राजनीतिमार्ग चालू करून सर्वच प्रभावली प्रांत स्वपराक्रमानें आपल्या हस्तगत केला. ॥१॥जोराच्या - वेगाच्या युद्धांत निष्णात, प्रख्यात, शहाण्या अशा त्र्यंबक भास्करास शिवाजीनें लगेच प्रभावली प्रांताचा अधिकारी नेमलें. ॥२॥क्रोधानें राजापूरची संपत्ति हरण करणार्या व बलानें शृंगारपूर जिंकणार्या त्या शिवाजीस शत्रूकडील शेंअक्डों शरणेच्छु श्रेष्ठ सैनिक प्रणाम करूं लागले. ॥३॥मग त्या नगराच्या ( शृंगारपूरच्या ) रक्षणासाठीं जवळच असलेला प्रख्यात गड क्षणभर पाहून त्यानें त्याचें ‘ प्रतीतगड ’ असें नांव ठेविलें. ॥४॥चंद्र, कमळतंतु, चांदणें, दंव, चंदन, चांपा इत्यादीच्यायोगें आनंद देऊन अत्यंत सुखावह अशा ग्रीष्म ऋतूनें त्याची सेवा केली. ॥५॥आश्रयास असलेल्या बकुळी व पाडळी यांच्या फुलांच्या बाणांचा भाता धारण करणार्या व ज्याचे बाण जगास जिंकणारे आहेत अशा कोमल मदनानेंसुद्धां शिवाजीचें मन हरण केलें नाहीं ( तो मदनवश झाला नाहीं ). ॥६॥ग्रीष्म ऋतु आला असतां अतिशय तापणांच्या सूर्याच्या योगें कोमट झालेल्या पाण्यच्या खालीं नद्यांत चांगलें शीतळ पाणी होतें ( व ) जनांवरें त्या आश्रयावर तेथें होतीं. ॥७॥अतिशय कडक ऊन्ह असणार्या ग्रीष्म ऋतूनें प्रत्येक दिवशीं तलावांतील पाणी आटवून टाकल्यामुळें ( कमी कमी केल्यामुळें ) सारसपक्षीं चिखलांत बसूं लागले आणि मासे व कांसवें यांचे थवेच्या थवे मरूं लागले. ॥८॥फुललेल्या शिरीष व पाडळी यांच्या छताच्या सुगंधानें सुगंधित झालेल्या वायूच्यायोगें विरक्त व विद्वान लोकांच्या मनाससुद्धां कामज्वराची बाधा झाली ! ॥९॥ N/A References : N/A Last Updated : September 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP