मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८७ वा| आरंभ अध्याय ८७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ विशेष श्लोक १ ते ५ श्लोक ३४ ते ३५ विशेष श्लोक ६ ते ७ श्लोक ३६ विशेष श्लोक ८ श्लोक ३७ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ८७ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । श्रीजगद्गुरवेनमः । ॐनमोजी श्रीगोविन्दा । प्रणवात्मका प्रणतवरदा । प्रभवावनप्रलयधंदा । तदपवादा प्रबोधका ॥१॥प्रबोधक तूं श्रीगोविन्द । गोशब्दात्मक केवळ वेद । तद्वेत्ता तूं विदविद । वदवीं विशद वेदस्तुति ॥२॥तूं वाग्देवी वदविता । लक्ष्मी संपन्न तुझिया सत्ता । विश्व प्रकाशी तुझेनि सविता । चंद्रीं अमृता पूरक तूं ॥३॥तो तूं माझिये हृदयकमळीं । सर्वग वससी प्रबोधशाळी । उत्साह संविन्मयकल्लोळीं । तोचि हेलावे दयार्णवीं ॥४॥संपतां षडशीतितमाध्यायीं । शुकें नृपाच्या श्रवणालयीं । गोष्टी वदला जे शेषशायी । कथिली पाहीं ते अवघी ॥५॥सन्मार्ग बोधूनि उभयभक्तां । कृष्ण झाला द्वारके जाता । परिसोनि ऐसिया वृत्तान्ता । कौरवनाथा स्मय गमला ॥६॥सताम् मार्ग तो सन्मार्ग । स्वतःप्रमाणभूत चांग । परतः प्रमाणाचें आंग । न करी लाग जयाचा ॥७॥प्रमाण नोहे हें अप्रमाण । ऐसिया वयुनाचें कारण । तो जेथें संशय न वसे पूर्ण । ते वेद जाण सच्छब्दें ॥८॥तया सन्मार्गें ब्रह्मोपलब्धी । बोधूनि श्रीकृष्ण कृपानिधी । द्वारके गेला ऐसी शाब्दी । शुक प्रतिपादी परि न घडे ॥९॥ऐसी अघटमान शुकोक्ति । हृदयीं मानूनि परीक्षिती । पुसता झाला सप्ताशीति - । तमाध्यायीं तें ऐका ॥१०॥तया प्रश्नाचें उत्तर । देईल श्रीशुकयोगीश्वर । तो इतिहास वेदान्तपर । नारदनारायणयोगें ॥११॥तो रायाचा कैसा प्रश्न । सज्जनीं परिसिजे सावधान । मूळश्लोकोक्त पद्यावरून । भाषाव्याख्यान हरिवरद ॥१२॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP