मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक ११ ते १६ अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक ११ ते १६ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १६ Translation - भाषांतर सिंचंतावश्रुधाराभिः स्नेहपाशेन चावृतो । न किंचिदूचतू राजन्बाष्पकंठौ विमोहितौ ॥११॥अश्रुधारा स्रवती नयन । तेणें शिंपिती निजनंदन । स्नेहपाशांचें आवरण । पडतां ज्ञान विसरलीं ॥२॥कंसहननादिप्रतापवंत । ईश्वरभावें भाविले सुत । भगवद्वचनें मोहग्रस्त । तो वृत्तांत विसरलीं ॥३॥पुत्रमोहें झळंबलीं । ईश्वरभावना विसरलीं । शब्द न फुटे स्तब्ध झालीं । स्फुंदों लागलीं ममतेनें ॥४॥कंठ दाटला स्नेहभरें । नयनीं बाष्पांबु पाझरे । वदनीं न निघती अक्षरें । मोहें यदुवरें भुलविलीं ॥१०५॥एवमाश्वास्य पितरौ भगवान्देवकीसुतः । मातामहं तोग्रसेनं यदूनामकरोन्नृपम् ॥१२॥कुशळा मनुष्यांचिये परी । पितरां आश्वासूनियां हरि । जो जन्मला देवकीउदरीं । ऐश्वर्यधारी अचिंत्य ॥६॥तंव अक्रूरोद्धवादिक । अंतरंगकृतविवेक । म्हणती नगर अराजक । सहसा क्षणैक न टकावें ॥७॥नृपावांचूनी नृपासन । राष्ट्र नगर पडलें शून्य । प्रजा पीडिती दस्युगण । नसतां शासन नृपाचें ॥८॥ऐसें अकोनि चक्रपाणि । उग्रसेनाप्रति येऊनी । कंसदुःखा परिहरूनी । राज्यासनीं बैसविला ॥९॥देवकीचा तातभ्राता । उग्रसेन कंसपिता । तयासि बोले मन्मथजनिता । तें तूं कुरुनाथा अवधारीं ॥११०॥आह चास्मान्महाराज प्रजाश्चाज्ञप्तुमर्हसि । ययातिशापाद्यदुभिर्नासितव्यं नृपासने ॥१३॥हरि म्हणे गा महाराजा । आम्ही समस्त तुझिया प्रजा । आज्ञानियम वाहूं तुझा । शासनीं सहजा तूं अर्ह ॥११॥जरी तूं आम्हांसि सिंहासनीं । बैसा म्हणोनि प्रार्थिसी वचनीं । तरी ययातिशाप यदुसंतानीं । पूर्वींहूनी अनुल्लंघ्य ॥१२॥जरा घेऊनि तारुण्य देणें । म्हणतां ययाति यदुकारणें । निर्भर्त्सूनि निष्ठुर वचनें । विमुख तेणें दवडिला ॥१३॥तेणें शापिला स्वसुत यदु । वयसा नेदुनी निष्ठुर वादु । करिसी तरी हा शापशब्दु । ऐकें विदुषु पैं माझा ॥१४॥तुझिये वंशीं साम्राज्यचिह्न । नसो कोणासि सिंहासन । अनुल्लंघ्य माझें हें शापवचन । लंघितां संतान क्षय पावे ॥११५॥ऐशिया ययातिशापास्तव । आम्हांसि सिंहासन अनर्ह । तूं जरी म्हणसी मी यादव । तरी शापभेव तूं न धरीं ॥१६॥राया माझिये आज्ञेवरून । अंगीकारीं तूं सिंहासन । तुज न बाधी शापवचन । करीं शासन यदुचक्रा ॥१७॥जरी तूं म्हणसी जराजराट । मजला अयोग्य राज्यपट । सामंत भूपति बळिष्ठ । देती कष्ट प्रजांसी ॥१८॥ऐशी शंका न धरीं मनीं । सेवक असतां मी चक्रपाणि । तुझें शासन त्रिभुवनीं । यदुमेदिनी ते किती ॥१९॥मयि भृत्य उपासीने भवतो विबुधादयः । बलिं हरंत्यवनताः किमुतान्ये नराधिपाः ॥१४॥तुझा भृत्य मी आज्ञाधर । असतां वरुणेंद्र इंद्रयमकुबेर । पूजा अर्पूनि सादर । होवोनि किंकर वोलगती ॥१२०॥तेथ माण्डलिक नरपति । अथवा होतु कां चक्रवर्ती । त्यांची येथ गणना किती । लावीन ख्याति कृतांता ॥२१॥मज सेवितां तुझे चरन । सुरवर येती तुजला शरण । अन्य भूपांचा केवा कोण । प्रजापीडन करावया ॥२२॥इत्यादिवचनीं मातासह । कृष्णें करूनि निःसंदेह । सिंहासन देऊनि पहा हो । छत्र धरिलें स्वहस्तें ॥२३॥पटहघोषें आज्ञानिदेश । जाणविला माण्डलिकांस । ते वोळगती होवोनि दास । प्रजा विशेष सुखावल्या ॥२४॥देशोदेशीं अभयपत्रें । प्रजा आणूनि पाहिल्या नेत्रें । तद्वृत्त ऐकोनियां त्यांचेनि वक्त्रें । सुखासि पात्रें त्या केल्या ॥१२५॥त्यानंतरें विषयपति । आपले गोत्रज बन्धुज्ञाती । क्म्सभयास्तव दिगंतीं । प्रजांप्रति पुसोनि ते ॥२६॥सर्वान्स्वज्ञातिसंबंधान्दिग्भ्यः कंसभयाद्गतान् । यदुवृष्ण्यंधकमधुदाशार्हकुकुरार्यकान् ॥१५॥सभाजितान्समाश्वास्य विदेशावासकर्शितान् । न्यवासयत्स्क्गेहेषु वित्तैः संतर्प्य विश्वकृत् ॥१६॥कंसहननादि समस्त । पत्रींण लिहून अभीष्टवृत्त । सम्मानूनि यथायुक्त । कुटुंबें सहित आणिले ॥२७॥आपुले स्वजन सुहृद आप्त । बन्धु सोयरे दिगंतीं गुप्त । कंसप्रतापानळें दीप्त । भयसंतप्त सर्वदा ॥२८॥यादव वृष्णि अंधक मधु । दाशार्ह कुकुर आर्यक विविधु । भोज सात्वत समस्त बंधु । आणिले प्रसिद्ध सम्मानें ॥२९॥सभास्थानीं ज्यांसि मान । ते ते पदीं त्यां स्थापून । कंसभयें जो पावले शीण । तो संपूर्ण विसरविला ॥१३०॥नष्टचर्य प्रवासें शिणलें । धनीं रत्नीं ते सुखी केले । स्वस्वगेहीं संस्थापिले । आश्वासिले जगदीशें ॥३१॥कृष्णहस्तें पावोनि मान । पूर्णानंदें निवाले स्वजन । गौण मानूनि शक्रासन । ते निजसदन सेविती ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP