मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| आरंभ अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगोविंदपरमात्मने नमः ॥ भावें वंदूं जातां पद । तंव भाव भावना भाव्य विशद । गिळूनि प्रकटिसी स्वानंद । साक्षित्वभेद ग्रासूनी ॥१॥भाव म्हणिजे आस्तिक्यता । तव पदभजनीं निर्धारितां । पदभजनाची अमोघ सत्ता । प्रकटी तत्त्वता प्रतीति ॥२॥प्रतीतीचें जें लक्षण । प्रतिबिंब विवर्तरूप जाणोन । मुख्य बिंब अवगम्यमान । प्रतीति जाण या नांव ॥३॥अंतःकरणींचा चित्प्रकाश । करणद्वारा भावी दृश्य । तये भावनेमाजी अशेष । विषयाभास भासतसे ॥४॥तेथ अनन्य तव पदभजनें । प्रत्यक्प्रवण होती करणें । तेव्हां निरास भाव्यभावने । अंतःकरणें अनुभवितां ॥५॥भावितां मात्र अंतःकरण । द्वैतोपरमें होय लीन । तेव्हां साक्षित्वभेदावीण । स्वानंदघन समरसतां ॥६॥ऐसी अगाध एकात्मता । जोडे तव पदभजननिरतां । पुढती व्युत्थानीं विवर्ता । जरी देखता होईल ॥७॥तरी तो बाधित विवर्तबोध । करूं न शके विषयीं बद्ध । करणद्वाराही स्वानंद । नित्योपलब्ध निःसीम ॥८॥सगुणपदभजनाचें ध्यान । ऐसें निरसूनि विषयभान । सबाह्य समाधिव्युत्थान । भ्रमावीण स्फुरों नेदी ॥९॥सबाह्य झालिया भ्रमातीत । न भासे पृथक्त्वें विवर्त । नित्यमुक्त निजात्मरत । पूर्णामृत परब्रह्म ॥१०॥इये भजनानंदप्रतीती । माजी सद्गुरु आज्ञापिती । दशमस्कंधाची व्युत्पत्ति । भाषाभारती वाखाणीं ॥११॥समल्लकंसाच्या निर्याणीं । संपली चतुर्थ एकादशिनी । पुढें नंदादिकांची ग्लानि । चक्रपाणि सांतवी ॥१२॥एकादशिनी ते पंचम । तये कथेचा अनुक्रम । पंचाध्यायपर्यंत नेम । पूर्वार्ध परम होईल ॥१३॥उत्तरार्धीं अध्यायषटक । पर्यंत कथिजेल सम्यक । एकादशिनीचें पंचक । श्रोतीं सविवेक परिसावें ॥१४॥प्रथमीं नंदादिपितृसांत्वन । राज्यीं स्थापूनि उग्रसेन । व्रतबंधादि गुरुसेवन । करूनि साग्रज स्वपुरा ये ॥१५॥शेचाळिसीं उद्धव व्रजा । धाडूनि बोधवी बल्लवभाजा । नंदयशोदाशोकाग्नितेजा । शमवूनि बोधें निववील ॥१६॥सत्तेचाळिसांमाजी उद्धव । हरिआज्ञेची अभिप्राव । व्रजांगनांसि बोधूनि सर्व । येईल गौरव लाहूनी ॥१७॥तया नांव भ्रमरगीत । गोपीउत्प्रेक्षासंकेत । तें व्याख्यान इत्यंभूत । अतंद्रित निरूपीं ॥१८॥अठ्ठेचाळिसामाजी कुब्जा । वरोत्तीर्णाचिया काजा । स्वयें भोगूनि त्रैलोक्यराजा । अक्रूर गजाह्वया धाडी ॥१९॥एकोणवन्नासीं अक्रूर । टाकूनियां हस्तिनापुर । पांडवांसि विषमाचार । न्याय निष्ठुर नृपा कथी ॥२०॥ इत्यादि पंचाध्यायीकथनीं । पूर्वार्ध संपवी बादरायणि । तें महाराष्ट्र वाखाणूनी । प्रेमळ श्रवणीं निववावें ॥२१॥ऐसी गुरुवरप्रेरणा । दयार्णवाच्या अंतःकरणा । होतां सज्जन सादर श्रवणां । करूनि कथना आदरीं ॥२२॥चव्वेचाळिसीं कंसवध । केलिया नंतरें श्रीगोविंद । पंचेचाळिसीं स्वव्रतबंध । गुरुसांनिध्य संपादी ॥२३॥तेथ अरणीगर्भसंभव । बादरायणि योगिराव । कथा निरूपी स्वयमेव । जाणोनि भाव नृपाचा ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP