मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४५ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ४५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १६ श्लोक १७ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० अध्याय ४५ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर यस्तयोरात्मनः कल्प आत्मना च धनेन च । वृत्तिं न दद्यात्तं प्रेत्य स्वमांसं खादयांति हि ॥६॥धनसंपत्तिऐश्वर्यश्वर । शरीरीं आरोग्य पटुतर । पितृसेवनीं अतत्पर । वंची शरीर धन धान्य ॥७३॥नेदी पितरासी जीवन । त्यांचें न रक्षी वर्तन । वृद्धें झालिया शक्तिहीन । संगोपन जो न करी ॥७४॥तो नर निरयपात्रभूत । देही असतां जीतचि प्रेत । मरणीं यमदूत अकस्मात । नेवोनि नरकांत घालिती ॥७५॥समुद्रीं न विझे वडवानळ । तेंवि त्याचा जठरानळ । क्षुधाशमनार्थ स्वमांसकवळ । यमभट केवळ भक्षविती ॥७६॥आपुलीं मांसें आपुल्या दशनीं । तोडोनि भक्षविती निशिदिनीं । ऐशा अनन्त यातनाश्रेणी । पितृसेवनीं विमुखातें ॥७७॥यदर्थी व्यवस्थाविशेष । स्वमुखें निरूपी आदिपुरुष । सावध करूनि मानसास । श्रोतीं अशेष परिसावें ॥७८॥मातरं पितरं वृद्धं भार्यां साध्वीं सुतं शिशुम् । गुरुं विप्रं प्रपन्नं च कल्पोबिभ्रच्छ्वसन्मृतः ॥७॥निजपितरांची सेवरहित । तैं तो पुत्र जीतचि प्रेत । वृथा ताचा परमार्थस्वार्थ । संशय येथ उपजला ॥७९॥दैव्यासुरीप्रकृतिमंत । कोणीएकाचें मिश्राचरित । ऐसे पितरासि पुत्र बहुत । त्यांमाजी क्कचित परमार्थी ॥८०॥मातापितरें भवभ्रमितें । राजसां तामसां भजती स्वार्थें । धिक्कारिती सात्विकातें । परमार्थातें उपेक्षिती ॥८१॥तरी काय त्यांचा वृथा जन्म । सात्विका केंवि म्हणिजे अधम । यदर्थीं निर्णय पुरुषोत्तम । स्वमुखें स्वधर्म वाखाणी ॥८२॥कल्प म्हणिजे सामर्थ्यवंत । सदाचारी स्वधर्मनिरत । तयाचा विध्युक्तपरमार्थ । रमाकांत निरूपी ॥८३॥वृद्ध माता वृद्ध पिता । सुशील भार्या पतिव्रता । पुत्र कुमार अदत्ता दुहिता । यांतें त्यागितां प्रेतत्व ॥८४॥सत्पुत्रासि परमार्थ मुख्य । यातें पाळावें सम्यक । मोहें कथिती जरी अविवेक । तो निष्टंक न करावा ॥८५॥गुरुशुश्रूषा सर्वांशिरीं । सुब्राह्मण जो सत्कर्मकारी । त्यांसि रक्षिजे सर्वांपरी । परमार्थथोरी हे मुख्य ॥८६॥अनाततायी शरणागत । जंव तो होय संकटरहित । तंववरी रक्षिजे अतंद्रित । मुख्य परमार्थ या नांव ॥८७॥ऐसियाची उपेक्षा करितां । हानि होय इहपरमार्था । जीतचि नर तो समान प्रेता । त्यासी सर्वथा नातळिजे ॥८८॥त्याच्या स्पर्शें सचैल स्नान । हव्यकव्यां तो अनर्ह जाण । देवपितर त्यासि देखोन । जाती पळोन पापभयें ॥८९॥इत्यादि पितृसेवारहित । तो संसारीं जीतचि प्रेत । आम्हांसि तेचि दशा प्राप्त । तो वृत्तांत हरि बोले ॥९०॥तन्नावकल्पयोः क्म्सान्नित्यमुद्विग्रचेतसोः । मोघमेते व्यतिक्रांता दिवसा वामनर्चतोः ॥८॥तस्मात् शिशुत्वें असमर्थ । कंसापासोनि भयत्रस्त । सर्वकाळ उद्विग्नचित्त । जीतचि प्रेत पैं झालों ॥९१॥यावत्काळ सेवेविणें । तुमच्या यथोक्त अनर्चनें । आमुचें निष्फळ झालें जिणें । तें केंवि वदनें बोलावें ॥९२॥आजिपर्यंत आयुष्याचे । दिवस निष्फळ गेले साचे । अर्चन घडलें नाहीं तुमचें । ऐसें वाचे हरि बोले ॥९३॥तस्मात् आम्ही सापराध । तुम्ही कृपाब्धि अगाध । गतगोष्टीचा न कीजे खेद । म्हणोनि मुकुंद प्रार्थितसे ॥९४॥तत्क्षंतुमर्हथस्तात मातरनु परतंत्रयोः । अकुर्वतोर्वां शुश्रूषां क्लिष्टयोर्दुर्हृदा भृशम् ॥९॥आम्हांपासूनि जें अंतर पडलें । तें तुम्हीं पाहिजे क्षमा केलें । स्नेहवर्जितें विघडिलें । कंसें दुष्टें दुर्जनें ॥९५॥कंसभयास्तव सक्लिष्ट आम्ही । शिशुत्वें परतंत्र पशुपसद्मीं । विमुख तुमचे शुश्रूषाकर्मीं । तें सर्व तुम्हीं क्षमावें ॥९६॥जननीजनकें सहज स्नेहाळें । आम्ही सापराध तरी बाळें । सर्व क्षमूनि पाळणें लळे । इत्यादि गोपाळें प्रार्थितां ॥९७॥शुक म्हणे गा परीक्षिति । ऐशा अनेक कारुण्योक्ति । बोलता झाला जगत्पति । त्या संक्षेपरीतीं तुज सांगो ॥९८॥श्रीशुक उवाच - इति मायामनुष्यस्य हरोर्विश्वात्मनो गिरा ।मोहितावंकमारोप्य परिष्वज्यापतुर्मुदम् ॥१०॥विश्वात्मा जो आदिपुरुष । नटला मायामनुष्यवेष । इत्यादि तेणें मधुरोक्तींस । वदोनि जनकास मोहिलें ॥९९॥त्याची ऐकोनि मोहक गिरा । द्राव आला पैं अंतरा । हृदयीं कवळूनियां कुमरां । आनंदनिर्भरा जाहलीं ॥१००॥मोहें कवळूनियां जनकीं । उभय कुमर घेवोनि अंकीं । आनंदाश्रूंचिया उदकीं । दोघांमस्तकीं वर्षती ॥१॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP