मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३१ वा| आरंभ अध्याय ३१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २१ अध्याय ३१ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीमद्गोविंदात्मने नमः । ज्याचिया ध्यानसुखाची चवी । अभेद आत्मावबोधा रुचवी । इहामुष्मिक संकोचवी । प्रज्ञा नाचवी परमार्थीं ॥१॥कोटिजन्मींचें निष्काम पुण्य । तेणें ईश्वर संतोषोन । करी सद्गुरूचें दर्शन । तैं प्रेमा गहन तद्भजनीं ॥२॥ईश्वरप्रसादें उपलब्ध । गुरुदर्शनें मनासि वेध । लागतां अभेद आत्मावबोध । रुचतां निषेध भवभाना ॥३॥शुक्तिरजताचा लाभ दुरी । देखोनि कल्पना अलंकारीं । उठती भवस्वर्गाचे परी । त्याची बोहरी तद्ग्रहणीं ॥४॥शुक्तिशकलें घेतां हातीं । उडोनि जाय रजतभ्रान्ति । भूषणसंकल्प न रुचती । तेंवि निवृत्ति भवस्वर्गा ॥५॥सद्गुरूचें मूर्तिदर्शन । होतां सप्रेम ठसावे ध्यान । तेणें स्वसुखसमाधान । अन्य साधन मग न रुचे ॥६॥सगुणसद्गुरुध्यानवेधें । प्रज्ञा वोसंडे परमानंदें । मग ते दृश्याचे खणोनि खादे । सदा स्वानंदें अवतरे ॥७॥सद्गुरुध्यानसुखाची गोडी । अभेद आत्मावबोध उघडी । इहामुष्मिका होय झाडी । विक्षेप झांपडी समवेत ॥८॥ईश्वरानुग्रहें सद्गुरु प्राप्त । न होतां येर जे संसारग्रस्त । रुचवूं न शकती स्वबोधामृत । काय निमित्त तें ऐका ॥९॥विषयलोभार्थ बराडी । जेथ देखे अर्थजोडी । तेथ जे दात्याची आवडी । तैसाचि भरडी परमार्थ ॥१०॥दाता देखोनि विलासिया । कामशास्त्राचि बोधावया । उक्ति अनेका ग्रंथींचिया । दाऊनियां प्रतिपादी ॥११॥यामळकुळार्णवतन्त्रें नाना । धुंडूनि काढी अनुकूल वचना । आणिकां तेथ बोलों देना । करी भर्त्सना तोंडबळें ॥१२॥तेथ विषयांध यजमान । मानी तयासीच सर्वज्ञ । तों तो वसवसी जैसें श्वान । कोणी विद्वान येतांचि ॥१३॥जरी त्या आवडे उपासना । तरी वाढवी बहुकामना । अभिचारिका पद्धति नाना । तद्गतज्ञान प्रबोधी ॥१४॥दावी प्रत्यक्ष चमत्कार । म्हणे देवतासामर्थ्य अपार । तदर्थ करी प्रयोगपर । जाणोनि अधिकार तयाचा ॥१५॥यजमान गीतनाट्यादिरसिक । असतां प्रबोधी तौर्यत्रिक । संगीतशास्त्राचा विवेक । सनाटक अलंकार ॥१६॥पिंगळादि नानाछंदें । तानमानें गद्यपद्यें । वेधूनि इत्यादि विनोदें । वेंची समुदें वयवित्त ॥१७॥दाता जाणोनि साबरपर । भूत प्रेत पिशाच अघोर । साधनविधानें विविध मंत्र । दावूनि तत्पर प्रबोधी ॥१८॥धनावाप्तीसी साभिलाष । यजमान देखोनि विशेष । कपिपिंजलादि वादींचे दंश । बोधी अशेष अहैतुक ॥१९॥बल्लीत्वगग्रमूळिकाकाष्ठीं । दरद पारद पाषाण कुनटी । कल्कक्षारभस्मादि वटी । धातुपालटीं प्रलोभी ॥२०॥कीं नाना अंजनें पंचाक्षरी । पायाळ देवगणी नरनारी । धनें काढवी मध्यरात्रीं । कीं स्वर्णाकर्षण उपदेशी ॥२१॥गुटिका चूर्णें रक्षालेप । दृष्टिबंधनें तिलक धूप । भुररी कपटें कायाकल्प । बोधितां पाप न म्हणती ॥२२॥एवं धनुर्वेद आयुर्वेद । गांधर्व शांभव ज्योतिर्वेद । नानापरीक्षा शिल्पकोविद । करिती प्रबोध यजमाना ॥२३॥सूपशास्त्रींची योग्यता । कळा चौसष्टी चातुर्यता । पूर्वमीमांसा प्रबोधितां । दानीं आस्था सकाम ॥२४॥निष्काम भूतदयेची जोडी । तेथ वेंचूं नावडे कवडी । फळाभिलाषें सकाम गोडी । ते दानपरवडी प्रबोधिती ॥२५॥एवं आपुल्या पोटासाठीं । मनधरणीच्या बोधूनि गोठी । वयवित्ताची करिती लुटी । दोघे शेवटीं नारकी ॥२६॥जैसे पोटार्थ भिकारी । श्वापदें शिक्षिती नानापरी । जें जें सत्व ज्या विकारीं । नाचे तैसें नाचविती ॥२७॥शुक सारिका बोलाविती । पन्नग नागस्वरें डोलविती । व्याघ्र प्रयासें चालविती । अश्व खेळविती कौतुकें ॥२८॥मर्कटा शिक्षिती बहुविकारीं । वृषभ नाचविती अंगावरी । जे शिक्षेचे जे अधिकारी । त्यां ते प्रकारीं शिक्षिती ॥२९॥एवं यजमानाची प्रीति । जाणोनि पंडित प्रबोधिती । ते यजमान श्वापदपंक्ति । शिक्षक पोटार्थी उभयत्र ॥३०॥अनन्यप्रेमें सच्छिष्य जडे । तरी त्या लावी प्रपंचाकडे । जें जें आपणा सुख आवडे । तें त्या कुडे उपपादी ॥३१॥निष्काम विरक्त देखोन । त्याचें करी निर्भर्त्सन । निर्दैव दरिद्री मूर्ख म्हणोन । करी हेळण दुर्वाक्यें ॥३२॥ऐसियांचिया प्रबोधनें । कैसेनि चुकती जन्ममरणें । दावूनि मानुष्य हें पेखणें । होती पाहुणे निरयाचे ॥३३॥ईश्वरानुग्रहें सद्गुरु प्राप्त । अपरोक्षज्ञान प्रबोधादित्य । उदयो न करी जों यथार्थ । व्यर्थ प्राकृत तंव अवघे ॥३४॥तो हा गोविंद गोकुळपति । वृत्तिरूपा गोपयुवति । आत्मवेधें भवनिवृत्ति । करूनि परमार्थीं लाजविल्या ॥३५॥ये अध्यायीं तेचि कथा । वनीं हुडकितां कृष्णनाथा । गोपी पावोनि विरहव्यथा । आल्या श्रमिता पुलिनातें ॥३६॥ N/A References : N/A Last Updated : May 04, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP