मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय २२ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय २२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ३८ अध्याय २२ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर हे स्तोतकृष्ण हे अंशो श्रीदामन् सुबलार्जुन । विशालर्षभ तेजस्विन् देवप्रस्थ वरुथप ॥३१॥कृष्णावेगळा गोपाळ आन । स्तोककृष्ण नामेंकरून । त्यासि संबोधी भगवान् । हे स्तोककृष्ण म्हणोनी ॥६६॥बलरामाहूनि वेगळा । त्या सुबळनामका गोपाळा । संबोधूनि तये वेळां । घनसांवळा बोलतसे ॥६७॥अर्जुन आणि विशाळनामा । देवप्रस्थ अंशु सुवर्मा । ऋषभ तेजस्वी श्रीदामा । वरूथपादि वयस्य ॥६८॥एवमादि गोपाळांसी । संबोधूनियां ऋषीकेशी । म्हणे पहा हो तरुवरांसी । करुणा कैशी जाकळी ॥६९॥पश्यतैतान् महाभागान् परार्थैकान्तजीवितान् । वातवर्षातपहिमान् संहतो वारयन्ति नः ॥३२॥पहा रे गडी हो या वृक्षांतें । दयावंतां सभाग्यांतें । परोपकारार्थ स्वजीवितें । अवंचकत्वें वाहती ॥२७०॥चंडवायु झडझडाट । जलवृष्टीचा कडकडाट । चंडकिरणांचा उद्भट । ग्रीष्मादिकीं निदाघ ॥७१॥तैसेंचि शीतकाळींचें हिम । प्राणिपीडक जें दुर्गम । इत्यादि आन सोसिती श्रम । देती विश्राम आम्हांतें ॥७२॥अहो एषां वर जन्म सर्वप्राण्युपजीवनम् । सुजनस्येव येषां वै विमुखा यान्ति नार्थिनः ॥३३॥परमाश्चर्य हें म्हणोनी । पहा हो हे स्थावरयोनि । जीवविताती सर्व प्राणी । सर्वार्पणीं सर्वदा ॥७३॥शाखा पत्रें पुष्पें फळें । अग्र अंकुर त्वचा मूळें । इच्छेसारिखीं एके काळें । अप्रूनि मोकळे निर्मम ॥७४॥जयांपासूनि विमुख अर्थी । कोण्हे काळीं ही न वचती । जन्मूनि धन्य ते परमार्थी । जे स्वार्थें परार्थीं उपकृत ॥२७५॥सज्जना परी ते हे द्रुम । अर्थिकांचे पुरविती काम । यालागीं धन्य त्यांचेंचि जन्म । पुरुषोत्तम म्हणतसे ॥७६॥सधनें वसनें धान्यें धनें । वृत्तिक्षेत्रतनुसंतानें । अर्थस्वार्थें पशुगोधनें । दयाळुपणें उपकरिती ॥७७॥जीवें प्राणें अवंचक । जयांपासूनि याचक । विमुख गेले हा कलंक । न शिवोनी शशांक लाजविती ॥७८॥तयांशीं तुल्य हे द्रुमवर । कैसे सर्वस्वें उदार । तेंचि स्वमुखें मुरलीधर । सविस्तर वर्णितसे ॥७९॥पत्रपुष्पफलच्छायामूलवल्कलदारुभिः । गंधनिर्यासभस्मास्थितोक्मैः कामान्वितन्वते ॥३४॥देखोनि पत्रांचे अर्थी जन । त्यांसि करिती पत्रार्पण । पुष्पेप्सूंचें आर्तिहरण । पुष्पें वोपूनि करिताती ॥२८०॥फळांची अपेक्षा असे ज्यांसी । इच्छिलीं फळें देती त्यांसी । वातातपशीतार्तांसी । स्वच्छायेशीं सुख देती ॥८१॥त्वचामूलें भस्मार्पणें । करूनि उपचारिती रुग्णें । मधुमक्षिकाभ्रमरघ्राणें । गंधार्पणें तोषविती ॥८२॥निर्यास म्हणिजे डीक चीक । त्यांचे अर्थी जे याचक । त्यांसि न होऊनियां विमुख । देती सुख तदर्पणें ॥८३॥तोक्म म्हणिजे पल्लवांकुर । केवळ शुष्ककाष्ठें ते दारु । वल्कलें त्वचांमाजील पदर । जे सादर तदर्पणें ॥८४॥अस्थि म्हणिजे अंठोळिया । त्याही अर्चिती अर्थियां । जीवें प्राणें वेंचूनियां । जे आलिया निवीवती ॥२८५॥ज्यांचे जैसे मनोरथ । ते पुरविती विसरूनि स्वार्थ । ऐसा जयांचा परमार्थ । धन्य परार्थ जे झाले ॥८६॥एतावजन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु । प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा ॥३५॥अनेक देहवंतांच्या ठायीं । येथ जन्मले जे मनुष्यदेहीं । त्यांचें जन्मसाफल्य पाहीं । गुणीं इहीं हरि म्हणे ॥८७॥मनुष्यदेहीं वृक्षापरी । अवंचक जे परोपकारी । त्यांचीच जन्मसाफल्यथोरी । वर्णी श्रीहरि निजवदनें ॥८८॥बुद्धिपूर्वक अर्थें प्राणें । येथ कायावाचामनें । श्रेय संग्रहिती परोपकरणें । सुकृताचरणें सर्वदा ॥८९॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP