मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय १८ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय १८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३२ अध्याय १८ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर गोपजातिप्रतिच्छन्ना देवा गोपालरूपिणः । ईडिरे कृष्णरामौ च नटा इव नटं नृप ॥११॥गोपजातीची गवसणी । घेऊनि अनुसरले जे कृष्णीं । ते गोपाळ वृंदावनीं । देवयोनि जाणावे ॥११॥म्हणोनि निंदेचा नेणती वारा । रंगी स्तविती येरयेरां । श्रीकृष्णा आणि बलभद्रा । सत्कारगिरा गौरविती ॥१२॥रंगीं होता रसोत्पत्ति । नट नटांतें प्रशंसिती । तैसे गोपाळ धन्य म्हणती । राम यदुपति नाचतां ॥१३॥बालक्रीडेचिया परी । रामगोपाळश्रीहरि । क्रीडा करिती परस्परीं । तें अवधारीं भूभुजा ॥१४॥भ्रामणैर्लंघनैः क्षेपैरास्फोटनविकर्षणैः । चिक्रीडतुर्नियुद्धेन कामपक्षधरौ क्कचित् ॥१२॥कोठें कोठें परिभ्रमणें । एकमेकांतें प्रतिज्ञापणें । आक्रमिती साभिमानें । बहुताडणें करचपळें ॥११५॥एकमेकां उल्लंघिती । प्रतिज्ञामानें अतिक्रमिती । आस्फोटनें आवेशती । आकर्षिती परस्परें ॥१६॥द्वंद्वयुद्धें मल्लयुद्धें । बाहुयुद्धें एकांगयुद्धें । क्रीडाभ्यासें करिती सिद्धें । कंसादियुद्धें साधावया ॥१७॥चूडाकरणापूर्वील केश । त्यांतें म्हणिजे काकपक्ष । तिहीं शोभती रामरमेश । काकपक्षधर ऐसे ॥१८॥कोठें क्षेपती परस्परें । कोठें आक्षेपिती निकरें । कोठें विक्षेपउत्तरें । अभिमानपरें बोलती ॥१९॥ऐशा अनेक अर्भकलीला । मिथ्या क्रीडती कौरवपाळा । तैसेचि अनुसरती गोपाळा । खेळामेळा क्रीडती ॥१२०॥क्कचिन्नृत्यत्सु चान्येषु गायकौ वादकी स्वयम् । शशंसतुर्महाराज साधु साध्विति वादिनौ ॥१३॥कोठें नाचती गोपाळ गजरीं । तेथें रामकृष्ण ताल धरी । होऊनिया सप्तस्वरीं । गीतवाद्यें साहित्यें ॥२१॥अन्य गोपाळ नाचती जेथ । गायक वादक होऊन तेथ । संगीतकलाकौशल्यपथें । साहित्यातें पुरविती ॥२२॥भलाभला म्हणोनि त्यासी । स्वमुखें श्रीकृष्ण प्रशंसी । ऐसे रामकृष्ण संवगडियांसी । संतोषासी पावविती ॥२३॥नृत्यें लाजविल्या अप्सरा । गानें गंधर्वकिन्नरां । वाय्दें सिद्धसाध्यां चतुरां । चमत्कारां चोजविती ॥२४॥क्कचिद्बिल्वैः क्कचित्कुंभैः क्क चामलकमुष्टिभिः । अस्पृश्यनेत्रबंधाद्यैः क्कचिन्मृगखगेहया ॥१४॥कोठें कोठें बिल्वफळा । संग्रहूनि खेळती खेळा । कोठें कुंभीफळीं आगळा । दाविती सोहळा क्रीडेचा ॥१२५॥कोठें धात्रीफळांच्या मुष्टि । चिंतूनि प्रतिज्ञापरिपाटीं । प्रवर्ततीं निजअभीष्टीं । जिंकिल्या तुष्टि मानिती ॥२६॥कोठें खेळती डोळे झांकणीं । एक बैसवूनि मुखरणी । नेत्र एकाचे बांधोनी । येर लपोनि राहती ॥२७॥अवघे लपोनि ठेलिया गडी । मुखरणी त्याचे नेत्र सोडी । स्पर्शों जातां अतितांतडी । पडे मुरकुंडी गडियाची ॥२८॥मुखरणीतें न स्पर्शितां । जरी त्या स्पर्शे पैं हुडकिता । तरी डाई आली त्याचिये माथां । चक्षु झांकविता तो होय ॥२९॥तैसाचि हुडकी तोही पुन्हा । वेगां स्पर्शों धांवें आनां । ऐसें करोनि नेत्रपिधाना । क्रीडा नाना क्रीडती ॥१३०॥दावूनि मृगाचे अनुकार । चेष्टा करिती कुरंगाकार । कोठें पक्ष्याचे प्रकार । चेष्टा अपार दाविती ॥३१॥क्कचिच्च दर्दुरप्लावैर्विविधैरुपहासकैः । कदाचित्स्पंदोलिकया कर्हिचिन्नृपचेष्ट्या ॥१५॥कोठें उडती दर्दुरा ऐसे । येरां चरणीं धरिती तोषें । त्यांच्या सोडवणेच्या मिसें । गडी विशेषें विनविती ॥३२॥ऐशी मंडूकक्रीडारीति । राम गोपाळ श्रीपति । ठायीं ठायीं क्रीडताती । बालचरितीं संमत जें ॥३३॥एकमेकां उपहासवाणी । बोलती कैतवें ठकूनी । ठकल्या हांसती आनंदोनी । अवघे मिळोनि एकातें ॥३४॥कित्तेक साखर वदनीं माती । ऐसें एकातें पुसती । तेणें दावितां अवघे म्हणती । इतुकी माती या वदनीं ॥१३५॥ऐशा अनेक व्यंग्योक्ति । मिथ्या बोलोनि उपहासिती । कोठें हिंदोळां वळंघती । हालविती येरयेरां ॥३६॥वटवृक्षाच्या पारंविया । त्यांच्या करोनि हिंदोळिया । परस्परें देती पाळिया । बैसोनियां त्यांवरी ॥३७॥चाळीस पन्नास एक एका । बैसतां मोजिनि देती झोका । ऐशा पाळिया पृथकपृथका । गोपदारकां समस्तां ॥३८॥कोठें नृपाचिये क्रीडेपरी । सिंहासनावरी श्रीहरि । बैसवोनि सर्वोपचारीं । गोपकुमारें वोळगिजे ॥३९॥सचिव प्रधान अमात्य मंत्री । एक होती वेत्रधारी । एक पृथक नियोगाचारी । स्वयें अज्ञाधारी म्हणविती ॥१४०॥देश दुर्ग भांडागार । एक म्हणविती सेनाधर । एक वार्तिकि चार हेर । एक किंकर वोळगणे ॥४१॥चामर पादुका आतपत्र । एक धरिती निशाण छत्र । एक दुंदुभि वाजंत्र । चित्रविचित्र वाजविती ॥४२॥ऐशा अनेक राजचेष्टा । दावूनि मानिती अभीष्टा । तें सुख दुर्लभ नीलकंठा । नेणें स्रष्टा स्वप्नींही ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : May 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP