निरंजन स्वामी कृत - अभंग ४६ ते ४९

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अभंग ४६.
तेची भक्ती खरी । देव अंतरीं बाहेरी ॥१॥
चराचर नरनारी । दिसे जयालागीं हरी ॥२॥
जया देवभक्तपण । नाहीं द्वैताचें भान ॥३॥
बोले नित्य निरंजन । करा तयासी वंदन ॥४॥

अभंग ४७.
देहे पंढरी पंढरी । आत्मा उभा वीटेवरी ॥१॥
लिंग देहाचें राउळ । बुद्धि रुक्मीणि वेल्हाळ ॥२॥
मन पुंडलीक उगा । वृत्ति स्थिर चंद्रभागा ॥३॥
निरंजन ह्मणे हरी । देखियला निजघरीं ॥४॥

अभंग ४८.
काय होऊं उतराई । तया सद्गुरूच्या पाईं ॥१॥
ज्याच्या वचनें संसार । उठाउठीं जाला दूर ॥२॥
देऊं धनसंपत्तीसी । तरि ते मिथ्या जडराशी ॥३॥
देह करावा अर्पण । तरि तो नाशवंत जाण ॥४॥
निरंजन ह्मणे फार । करूं आतां नमस्कार ॥५॥

अभंग ४९.
कामक्रोध यांनीं बहूत गांजीलें । श्रम - बहु जाले जीवालागीं ॥१॥
धाव हरी आतां न पाही निर्वाण । आले पंचप्राण कंठापाशीं ॥२॥
जरि तूं न येसी आतां देवराया । तरि दास वायां जाऊं पाहे ॥३॥
निरंजन ह्मणे स्वामी रघुवीरा । यावें गोदातीरा दीनबंधू ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP