मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामी कृत अभंग| अभंग ३६ ते ४० निरंजन स्वामी कृत अभंग अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते ३० अभंग ३१ ते ३५ अभंग ३६ ते ४० अभंग ४१ ते ४५ अभंग ४६ ते ४९ अभंग दत्तजन्माचे अभंग ५० ते ५४ निरंजन स्वामी कृत - अभंग ३६ ते ४० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : abhangmarathiniranjam raghunathअभंगनिरंजन रघुनाथमराठी अभंग ३६ ते ४० Translation - भाषांतर अभंग ३६.प्रथम नमन मारुतिरायासी । चिंतन मानसीं करूनीया ॥१॥जेणें सीताशोक केला निवारण । लंकेसी जाळून शुद्ध केलें ॥२॥तो हा बलभीम येवो या कीर्तनीं । देवो प्रेमधणीं आह्मालागीं ॥३॥रघुवीरगूण गाय निरंजन । वायूचा नंदन आठवोनी ॥४॥अभंग ३७.स्वामि रुद्रअवतार । त्यासि वंदूं वारंवार ॥१॥गाउं वाचेलागीं गूण । धन्य मारूती ह्मणून ॥२॥मनीं करूनीया ध्यास । नयनिं पाहूं सावकाश ॥३॥जो कां निरंजनवासी । भावें शरण आह्मी त्यासी ॥४॥अभंग ३८. देंवा देई तुझे भक्ती । आह्मां नको चारी मुक्ती ॥१॥देवा देई ऐसें प्रेम । जेणें येई तूज घाम ॥२॥गुण गाऊं वेळोवेळां । तुज येई कळवळा ॥३॥जो कां निरंजनवासी । भावें शरण आह्मी त्यासी ॥४॥अभंग ३९.काय वांचूनीया केलें । तुज नाहीं आठविलें ॥१॥व्यर्थ घातलें आयुष्य । भोगविषयाच्या मिसें ॥२॥देवा गेलों गेलों वाया । धांव धांव विठूराया ॥३॥करि कृपेचें पोषण । ह्मणे दास निरंजन ॥४॥अभंग ४०.दवा देईं ऐसें देणें । नको कोणासी मागणें ॥१॥पुरे होऊंदे वासन । सर्व माझी नारायणा ॥२॥ हेंचि देई मजलागीं । धन्य होईन मी जगीं ॥३॥निरंजन लागे पायां । कृपा करा रघूराया ॥४॥ N/A References : N/A Last Updated : November 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP