आरती मारुतीची - जय जय बलभीमा बलभीमा । अगा...
निरंजनस्वामीकृत आरती
जय जय बलभीमा बलभीमा । अगाध तवगुण - महिमा ॥धृ॥
वंदुनिया श्रीरामा केली । निजबळ तूं बळसीमा ॥१॥
सीताशोक निवारून । केले लंकापुरिच्या दहना ॥२॥
द्रोणाचळ गिरि अणिला । बंधु लक्ष्मण वांचंविला ॥३॥
निरंजन तवपायीं । भावें ठेवित येउनि डोई ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : September 03, 2017
TOP