प्रस्तावना.
ही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम
संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.
या काव्याच्या दोन प्रती आहेत. एक रा. रा. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचेकडे व दुसरी रा. रा. नारायण चिंतामण केळकर, काव्यसंग्रहकर्ते यांचेकडे. रा. राजवाडे यांची प्रत जुन्या खर्ची कागदाचे सुमारें ११ इंच लांब व ६ इंच रुंद अशा उभ्य वहीवर लिहिलेली आहे. ही वही रा. राजवाडे यांस पंढरपुराकडे एका बडव्याच्या घरीं मिळाली. या वहींत ` ही प्रत नगोजी शिवदेव तोतड्या वासिष्ठगोत्री यानें शके १६१६ भावनाम संवत्सरीं माघ वद्य ८ स केली, ' असे हींत उल्लेख केला आहे. ही वही फार अशुद्ध असून अगदीं जीर्ण झाली आहे. शिवाय हींत अक्षरें, शब्द, चरण व कित्येक ठिकाणीं सब्म्ध श्लोकही गाळले आहेत.
दुसरी प्रत रा. केळकरांकडली. ही सुमारे ११ इंच लांब व ८ इंच रुंद अशा पुस्तकवजा वहीवर काळजीपूर्वक लिहिलेली आहे. ही प्रत त्रुटित आहे व मूळ लेखकानें या ककव्याच्या प्रारंभीं ` सीतास्वयंवर विठ्ठलकविकृत ' असें म्हटलें आहे. या वहीवर लेखनकाल वगैरे माहिती नाहीं. परंतु ही वही अव्वल इंग्रजीचे सुमारास केव्हां तरी लिहिली गेली असावी.
या काव्यांतील श्लोक अश्लील आहेत ४. हा कवि काव्यांत ` नागेश, ' ` नागदेव, ' ` नागजोशी, ' ` नागेंद्र ' वगैरे शब्दांनीं आपल्या नांवाचा उल्लेख करितो. याचें नांव नागभट. हा अहमदनगराजवळ भिंगार म्हणून गांव आहे तेथला राहणारा. याचे वंसज अजूनही तेथें राहतात. गांवाच्या अगदीं शेवटाला यांचें राहतें घर आहे, व गांवाशेजारींच लहानसा ओढा आहे, त्याचे कांठीं या घराण्यांतील पुरुषांच्या समाधि आहेत. यांतून अमकी समाध अमक्याची असें कोणासही माहित नाहीं, किंवा आपल्या गांवांत कोणी असा कवि होऊन गेला अशाबद्दल गंधवार्ताही हल्लींच्या नागजोशाच्या वंशजांस किंवा भिंगारकरांस नाहीं. हल्लीं याच्या वंशजांत गंगाभागीरथी त्रिवेणिबाई या
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP