अभंग २
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
चाल : अति आनंद फुलवि कलिका
जेव्हां देहभाव पूर्ण लोपले ॥
तेव्हां आनंदाने हृदय भरले ॥धृ॥
त्या भावात मम मन रमले ॥
आनंद डोही मग ते बुडले ॥१॥
तन्मय होऊनी भान हरपले ॥
द्वैत भाव ते मुळी न उरले ॥२॥
ऐक्याचे सुख पूर्ण लाभले ॥
दासी म्हणे विठ्ठल स्वरूपी विरले ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP