राग - मांडपहाडी
चाल : “ पाली सुपरमेशा ”

नाही कुणी कुणाचे जगती ॥
माया नसे ही खरी जगती ॥धृ॥
नाही माया बंधु बहिणीला ॥
नसे ममता पिता पुत्रांना ॥१॥
नाही माया लेकी सुनांना ॥
ही सृष्टीच अशी बनली ना ॥२॥
मग कुणाचे गणगोत ॥
कुणाचे इष्ट मित्र ॥३॥
कां लावलीस मोह माया ॥
जिव गुंतविण्या वाया ॥४॥
एक जिवासी विठुराया ॥
दासी लागे श्रीहरी पाया ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP