अभंग ३
श्रीमंत पुतळाराजे डॉवेजर राणीसाहेब रचित त्रयोदश अभंगमाला.
राग - खमाज
तुझ्या दर्शने अती आनंद झाला ॥
जिवलग प्राणसखा मज भेटला ॥धृ॥
हृदयीचा भाव श्रीविठ्ठले जाणियला ॥
समाधान सुखाचा अंतरी साठा केला ॥१॥
काय सांगुं तो आनंद भेटला हरिला ॥
कुंठीत झाली वाचा अधिक वदण्याला ॥२॥
जिवनाधार माझा सखया पांडुरंगा ॥
चरणापासुनी दुर नको करू श्रीरंगा ॥३॥
तुझ्या चरणाची म्हणवीते मी दासी ॥
त्याचा धरी अभिमान ठाव दे पायासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP