मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य| माला २५१ ते ३०० दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य माला १ ते ५० माला ५१ ते १०० माला १०१ ते १५० माला १५१ ते २०० माला २०१ ते २५० माला २५१ ते ३०० माला ३०१ ते ३४३ माला २५१ ते ३०० श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती माला २५१ ते ३०० Translation - भाषांतर वा सना दुष्ट धरूनी । दुष्टसंगती करूनी ।पाप केलें हर्षूनी । भागी कोणी नसे त्याचा ॥५१॥र डोनी ऐसी स्वकर्मासी । संतापूनी मानसी ।शरण जावूनी द्विजासी । निवेदी त्यासी सर्वही ॥५२॥य मयातना टाळाया । जन्मारभ्य पाप तया ।निवेदितां माझी दया । आली तया विप्रासी ॥५३॥नि र्मळ होसी म्हणे द्विज । सर्व सोडुनी दे आज ।थोर तीर्थ प्रयागराज । तारील तूज निर्धारें ॥५४॥वा रावया पापासी । शीघ्र जायीं प्रयागासी ।क्षाळिसी सर्व पापासी । अनुतापासी पावतां ॥५५॥र मणीय त्याचें वचन । निश्चयें अंगीकारून ।गृह भूषा धन स्वजन । सर्व सोडून दिधलें ॥५६॥य मयातना पुढें जाणूनी । पाप मनीं आणूनी ।चित्तीं अनुतापूनी । विप्रा वंदुनी विनविलें ॥५७॥व्या कूळ झालें माझें मन । करा त्याचें समाधान ।प्रयागीं करितां माघस्नान । मत्समान तरे कीं ॥५८॥धीन् धीन् थै थै करोनी । सर्व जन लुटोनी ।पाप केलें त्याची धुणी । कराया मनीं स्थिरावें ॥५९॥वि श्वास व्हावया चित्ता । सांग एक प्राचीन कथा ।कोण पापी प्रयागीं न्हातां । तरला दुरितापासुनी ॥२६०॥ना नापरी विनवितां । विप्र वदे ऐक आतां ।गती लाधली पुरुहूता । सर्व दुरिता वारुनी ॥६१॥श ची ज्याची असे प्रिया । उर्वश्यादि वश्य जया ।दुर्बुद्धी त्या देवराया । बरी न या दवडूनी ॥६२॥य मादि योगसंपन्न । गौतमर्षीं तपोधन ।तत्पत्नी अहल्या जाण । तीवरी मन इंद्र करी ॥६३॥वि वेक सोडुन स्वर्गाहुन । इंद्र आला भुलोन ।गौतमस्वरूप धरून । कामुक होवुन पातला ॥६४॥ना हीं गौतम जाणून । स्वयें गौतम बनून ।अहल्येपासीं येवून । तीला फसवून उपभोगी ॥६५॥श तक्रतू करोनी । देवाधिपत्य पावुनी ।स्वर्गी राहे तोची मनीं । हें घेवोनी बुडाला ॥६६॥य ज्ञीं ज्याचा पूर्वभाग । तो करी ऐसें आग ।तत्क्षणीं ये ऋषी सवेग । जाणोनी मग इंद्र भ्याला ॥६७॥दु: खी होवूनी ये बाहेर । गौतमें जाणोनी सत्वर ।शापिला कीं अंगावर । भगें सहत्र पडतील ॥६८॥खं ती करी अहल्या ती । अज्ञानें हो दुर्मती ।मुनी शापूनि शिला करिती । पुढें रामें ती उद्धरिली ॥६९॥ह तदैव देवेश । भगें पडतां शरीरास ।मेरुपर्वती गुहावास । करी त्रास पासून ॥२७०॥र डे केल्या कर्मासी । धिक्कारी आपणासी ।विरह झाला शचीसी । बृहस्पतीसी ती पुसतसे ॥७१॥ह सोनी म्हणे बृहस्पती । चला दावूं देवपती ।शची देवांसह येती । मेरुपर्वतीं तेधवां ॥७२॥र डत बैसला देवेश । बृहस्पती दावी तयांस ।लाजोनी इंद्र देहास । झांकोनी ठेवी ते क्षणीं ॥७३॥दा टोनी शोकें गुरूला । इंद्र म्हणे तारा मला ।पुन: न करीं ह्या कर्माला । अनुग्रह केला पाहिजे ॥७४॥रि घतां शरण गुरूतें । दयेनें तो वदे त्यातें ।जावूनी ब्रह्मक्षेत्रातें । तीर्थराजातें सेवीं तूं ॥७५॥द्रं ममित धन दान । देतां होय मेरुसमान ।खास ज्याला उपमान । न ये त्रिभुवनतीर्थाची ॥७६॥वि विध पापें जो हरी । तेथें तूं स्नान करीं ।हें ऐकूनी वृत्रारी । जावूंनी करी मकराकीं स्नान ॥७७॥द्रा क्पाप जावून । इंद्र झाला सहस्रनयन ।तूं करीं त्रिवेणीस्नान । चित्तीं चिंतून शंकरा ॥७८॥व चन ऐसें विप्राचें । परिसोनी मनाचें ।स्थैर्य करोनी प्रयागाचें । केलें त्याचें दर्शन ॥७९॥य त्स्नान तीन दिन । करितां पाप जावून ।शेष मासस्नानें जाण । अप्सरापण मज आल्यें ॥२८०॥वि दुषी होवुनी कैलासीं । राहें गौरीहरापासीं ।अद्यापी माघमासीं । प्रतिवर्षीं स्नान करीं ॥८१॥द्रा क्तारिलें हा उपकार । स्मरोनी कराया दूर ।कृतघ्नत्वा सादर । ऐसा निर्धार केला म्यां ॥८२॥व चन तीचें परिसूनी । राक्षस वदे नमूनी ।पूर्वजन्म आठवूनी । खिन्न होवुनी निवेदीं मी ॥८३॥य न्नामाचें स्मरण । करी पाप निवारण ।त्या काशींत जन्मून । श्रेष्ठ ब्राह्मण मी होतों ॥८४॥दे वर्षिपित्रर्चन । न घडलें विप्रतर्पण ।न केलें इष्टापूर्तदान । न केलें स्नान गंगेचें ॥८५॥हं सजप किंवा ध्यान । न केलें घेतलें दान ।दुष्टापासून अनुदिन । ब्रह्मस्व हिरोन घेतलें ॥८६॥पो ट भरीं अभक्ष्यभक्षणें । सत्यवार्ता कधीं नेणें ।सर्व पापें पूर्णपणें । देती ठाणें माज्याठायीं ॥८७॥ष डिंद्रियें नावरलीं । थोरांची बोली नायकिली ।काशीक्षेत्रीं मृती आली । दैवें झाली दुर्दशा ॥८८॥य न्नाम अविमुक्त । जेथें सर्व होती मुक्त ।तेथें होतां पापसक्त । भैरव युक्त दंडी त्याला ॥८९॥पो ञ्चतां अन्यत्र मरण । त्याला यमयातना दारुण ।काशींत मरतां जाण । भैरवशासन क्षेत्रपाप्या ॥२९०॥ष ट्शास्त्रीं असोनि निपुण । क्षेत्रीं केलें पापाचरणं ।म्हणोनीं विश्वेश्वरें जाण । भैरवशासन योजिलें ॥९१॥य च्छासनें नवू योनी । प्रेतभूतादि भोगूनी ।दाहावें जन्म ये स्थानीं । राक्षसयोनी मिळाली ॥९२॥चित् तीं नसे सुखलेश । भोगीतसें दारुन क्लेश ।माझे दृढकर्मपाश । मोक्षीं निराश होतों मी ॥९३॥तं टा करोनी ब्राह्मण । जिंकीं विद्यामदें जाण ।त्याचें फळ हें दारुण । राक्षसपण शेवटीं ॥९४॥तो क्षेत्रवास केवळ । झाला आतांची सफळ ।पदरीं तेंची पुण्यबळ । दर्शनें कळतसे तुझ्या ॥९५॥ष ष्ठीसहस्र संवत्सर । या जन्मास झाले फार ।कष्ट भोगिले आतां तार । मातें सत्वर दयेनें ॥९६॥य थार्थ सर्व सांगून । ब्रह्मराक्षस नमून ।आड पडला तें पाहुन । वळली कांचनमालिनी ॥९७॥तो जरीं महापाप । त्याला कराया विपाप ।ती दयेनें आपोआप । त्याचे ताप निवारी ॥९८॥ष ष्ठीसहस्र वर्षें तूं रे । पाप भोगिलें येथें रे ।नवू जन्मीं तसें सारें । कर्म बरें क्षाळिलें ॥९९॥य मयातना जरीं होत्या । चौर्याऐशीं लक्ष धिरट्या ।कदापीही न चुकत्या । क्षेत्रवासें त्या वारिल्या ॥३००॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP