मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य| माला १ ते ५० दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य माला १ ते ५० माला ५१ ते १०० माला १०१ ते १५० माला १५१ ते २०० माला २०१ ते २५० माला २५१ ते ३०० माला ३०१ ते ३४३ माला १ ते ५० श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती माला १ ते ५० Translation - भाषांतर श्री गणेशाय नम: । श्रीसरस्वत्यै नम: ।श्रीकुलदेवतायै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ।ॐ कारसद्रस पाजुनी । आवृत्तिरोग निरसुनी टाकिला ज्या गुरुवैद्यानीं । त्यांला ध्यानीं आणूं नित्य ॥१॥न चले कोणाचें औषध । व्यर्थ झाले यत्न विविध ।असाध्य तो रोगबाध । प्रणवबोधरसे केला ॥२॥मो घ होता अन्योपाय । भावें धरिले म्यां पाय ।प्रीत होवुनि गुरुमाय । सर्वापाय दूर करी ॥३॥भ क्तिरसाच्या अनुपानें । ज्याणें अर्धमात्रानें ।ध्यानपथ्य योजुनी क्षणें । रोगभेणें दवडिलें ॥४॥ग ती अतर्क्य औषधाची । एकाक्षरें या जीवाची ।एकाक्षरता झाली साची । नवल हेंची न वर्णवे ॥५॥व र्णवेना द्वैतपणा । तथापि वाराया कृतघ्नपणा ।गुरुशिष्यत्व लक्षणा । योजूं बाणा प्रगटाया ॥६॥ ते जस्वी यदुपदेश । अविद्यांधतमसनाश ।कराया जो सामग्रीस । इच्छी खास न कदापी ॥७॥दत् ताभय दत्तात्रेय । तोचि माझा गुरुराय ।त्याचे नित्य चिंतूं पाय । जे अपाय निवारिति ॥८॥ता रक जो ह्या कलियुगीं स्मृतिगामी पावे वेगीं ।यत्कृपेनें धन्य जगीं । होती रागी विरागी ॥९॥त्रे धा पापतापहर । त्याणें केला जो सादर ।कार्तवीर्या बोध रुचिर । भाषांतर करूं त्याचें ॥१०॥या भाषेची प्रौढी आज । लोकां असे प्राय: मज ।धीप्रेरकें दिधला उमज । निजगुज समजवाया ॥११॥य मादियोगसंपन्न । कार्तवीर्य तो अर्जुन ।सह्यतटीं माघीं येवुन । श्रीदत्तचरण वंदितसे ॥१२॥स्म रणभक्ति ज्याची पूर्ण । ज्याला मानितो सिद्धगण ।माघस्नातां तो देखोन । प्रार्थी अर्जुन श्रीदत्ता ॥१३॥र क्षावा हा यत्नें देह । ह्याच्यायोगें स्वसंदेह ।फिते त्याला जनसमूह । पीडितो मोहग्रस्त हा ॥१४॥ण कारांत रायमघ्य । ज्याला नाकार हो आद्य ।तो तूं ह्या नरांला साध्य । होसी दुराराध्य इतरांला ॥१५॥मा नुषदेह दुर्लभ । त्याचा झाला ज्यांला लाभ । ते त्या देती जरी क्षोभ । ईशक्षोम तयां हो कीं ॥१६॥ त्र स्त पूर्वीं जो शीतानें । पुन: त्याला माघस्नानें ।अत्यंत शीतजलानें । नित्य यत्नें कष्टविती ॥१७॥सं कल्प तरी त्या स्वर्गाचा । काय उपयोग नश्वराचा ।संदेह हा मच्चित्ताचा । वारा साचा शिष्य मी ॥१८॥तुष् ट होवुनी दत्त वदे । उपाय हा योजिला वेदें ।लोकां वळवाया फलवादें । अधिकारभेदें योजिला ॥१९॥टा ळावया विषयाशा । वेद योजी युक्ती अशा ।सद्धर्में क्षाळुनी दुराशा । क्रमें पाशा तोडवितो ॥२०॥य ज्ञादिक धीशुध्यर्थ । योजिले ते यथार्थ ।न घडती त्याला हा स्वार्थ । दावी समर्थ वेदराज ॥२१॥म हाकष्ट स्वार्थामुळें । न पाहती हे जन भोळे ।देहा धन्यत्व सोहाळे । धर्मबळें त्यां लाधती ॥२२॥हा रक्तमांसास्थिमय देह । पंचभूतांचा समूह ।नाना दोषांचें हें गेह । काममोहस्थान हेंची ॥२३॥भ य ज्याच्यायोगें नित्य । यदर्थची घडे अकृत्य ।तथापि हा अशुची अनित्य । त्याचें अगत्य किती पहा ॥२४॥य ज्जन्म स्त्रीविटाळांत । विष्ठामूर्तीं झाला मूर्त ।विष्ठा मूत्र ज्याचे आंत । वाहतसे नवद्वारें ॥२५॥नि त्य क्षाळितांही ये वीट । कृमिविट्भस्म शेवट ।ज्याचें तो हा देह स्पष्ट । दोषदुष्ट काळभक्ष्य ॥२६॥वासनेचें हें माहेर । ममताहंतेचें हें घर ।मोक्षस्वर्गनरकद्वार । दुर्धर दुष्पूर वंचक ॥२७॥र क्षणार्थ यत्न करितां । काळ पळवी न कळतां ।जीववियोगें अस्पृश्यता । मग कां अहंता तशाची ॥२८॥णा णें पारखी परीक्षक । तैसा आत्मानात्मविवेक ।सत्तास्फूर्तीनें हा येक । करी चोख न इतर ॥२९॥य त्प्राप्ति अति दुर्लभ । ह्याणेंच घडे मुक्तिलाभ ।व्यर्थ याचा न कीजे लोभ । देवक्षोभ अन्यथा ॥३०॥म नुष्यें स्वदेहपीडन । व्यर्थ न कीजे साच जाण ।शास्त्राधारें करितां कोण । अकारण वदेल तें ॥३१॥हा माघ अघनाशन । सूर्योदयीं करितां स्नान ।सर्व पातक परिहारून । अढळ स्थान देतसे ॥३२॥ज्ञा नेंच मोक्ष होतो खास । परंतू तें न पापियास ।लाभे म्हणोनि पापर्हास । शास्त्र खास करवी असें ॥३३॥न होतां पापक्षालन । न लाभे ज्ञानसाधन ।साधनाविना न ठसे ज्ञान । म्हणोन योजी शास्त्र हें ॥३४॥प्र कृती प्राक्तन चेष्टा करवी । ह्या सद्धर्में तीला बरवी ।वळवितां मोक्षपदवी । अचूक पाविजे न कष्टें ॥३५॥दा रपुत्रादिकां करितां । देहा कष्टविती त्या परता ।शास्त्राधारें पुण्य करितां । ईशक्षोभता न घडे ॥३६॥य ज्ञादिक परतंत्र । देह साध्य हें स्वतंत्र ।ऐकें एक द्विजकलत्र । गेलें परत्र ह्या योगें ॥३७॥चि मणी एक ब्राह्मणीं । बालवैधव्यें पीडूनी ।कपिलारेवासंगमीं जावुनी । माघस्नानें साठ केलीं ॥३८॥दा नधर्म करी नित्य । वदे वाक्य मिताल्पसत्य ।दुष्टसंग सोडुनी स्वकृत्य । करी अकृत्य निवारी ॥३९॥नं दन भ्रात्रादि स्वजन । धर्म एक सनातन ।ऐसें मानी अनुदिन । न करी पीन स्वदेहासी ॥४०॥दात् त्री साध्वी उंछवृत्ती । नित्य करी शिणे न चित्तीं ।स्वधर्मीं ठेवी जागृती । राखी सन्मती निरंतर ॥४१॥म न विषयीं न घाली । कृछ्र चांद्रायणें करी भलीं ।अशा आचारें वृद्ध झाली । ब्राह्मणी भली ऋचीका ॥४२॥ने में करितां माघस्नान । तिची बुद्धी पालटोन ।सहज लागलें विष्णुध्यान । देहावसान । समयासी ॥४३॥बा ल्यापासून केले कष्ट । त्याचें घे ती फल उत्कृष्ट ।विष्णुलोकीं अप्सरा वरिष्ट । ब्रह्मनिष्ठ तीसी ॥४४॥लो कीं न्से जीला उपमा । नाम जीचें तिलोत्तमा ।यत्सौंदर्या नसे सीमा । तिला ब्रह्मा प्रार्थितसे ॥४५॥न् ऋत्यगीतादि कौशल । तिलोत्तमे वाक्पेशल ।असे तुला निश्चल । ह्मणोनी चाल भूलोकीं ॥४६॥मत् त दैत्य सुंदोपसुंद । तन्मतीचा करीं भेद ।तेणें त्रैलोक्याचा खेद । निर्विवाद दूर होयिल ॥४७॥त थास्तु ह्मणोनी ये ती । सुंदोपसुंद तिला पाहती ।भुलोनी ऐक्य सोडिती । भोगू इच्छिती दोघेही ॥४८॥पि टोनि बाहू गदा घेती । परस्परें गजसे भिडती ।मीच भोगीन हे युवती । ह्मणोनी ताडिती परस्पर ॥४९॥शा तकुंभ आणि युवती । मती कोणाची न भेदिती ।त्यांत ही लावण्य संपत्ती । तन्मती भेदी बळें ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP