मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य| माला २०१ ते २५० दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य माला १ ते ५० माला ५१ ते १०० माला १०१ ते १५० माला १५१ ते २०० माला २०१ ते २५० माला २५१ ते ३०० माला ३०१ ते ३४३ माला २०१ ते २५० श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत दत्तमालावर्णांकितमाघमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती माला २०१ ते २५० Translation - भाषांतर य थार्थ होतां आचरण । शुद्ध होय अंत:करण ।मग सहजची ध्यान । लागे जाण अर्जुना ॥१॥स्तं भाधार जेवीं घर । तेवीं ज्ञान भक्त्याधार ।परभक्ती ज्ञानोत्तर । जे ईश्वरानुरक्ति ॥२॥भ क्ती ज्ञानाची जननी । ती मिळे सदाचरणीं ।तेव्हां ही लोकां करणी । होय तारिणी जाणावी ॥३॥य मादि योग सत्कार । कारण असे साचार ।तप श्रद्धा त्यांत थोर । योगिवर मानिती ॥४॥खें चावया इंद्रियां । मन हेतू होय तया ।बुद्धी खेंचे तिला राया । सत्वशुद्धी पाहिजे ॥५॥खें म देतां सत्वें धीला । आत्मा स्वयें दिसे भला ।आचार हा सत्वाला । शोधक योजिला श्रुतीनें ॥६॥मा घस्नान तुच्छ साधन । असें न मानो तुझें मन । हें ध्यानीं आणोन । पाहें भ्रमण न ये रे ॥७॥र चना वेदाची अचाट । अधिकारें दावी वाट ।भाविक तेणें जाती नीट । जे धीट ते तरती ॥८॥य त्नें आणि मार्गावर । वेद हा दयापर ।दोषारोप त्यावर । करतां नर न तरती ॥९॥मा घस्नानपुण्यें एक । ब्रह्मराक्षस तरला ऐक ।माघस्नान अपसरा सुरेख । करी एकभक्तीनें ॥२१०॥र मणी सर्वकलापूर्ण । कैलासी जीचें स्नान ।उमेची सखी होवून । शिवार्जन नित्य करी ॥११॥य त्नें प्रतिवर्षें ती । माघस्नानीं धरी प्रीती ।अर्धोदयीं आप्लुती । प्रयागीं ती करितसे ॥१२॥न टळे तीचा कधीं काळ । होतां नित्य उष:काळ ।प्रयागीं ये चपळ । योगबळ असे जीला ॥१३॥म: स्तकीं अंजुली बांधून । करी शंकरा नमन ।यथाविधी माघस्नान । करी मन लावुनी ॥१४॥सं कल्प ईशप्रीत्यर्थ । याहुनी नसे अन्यार्थ ।मग ती देहाचा स्वार्थ । प्राज्ञी किमर्थ राखील ॥१५॥पं नग भूषणें न्हाणाया । जल घेवुन चाले तया ।गायी चित्त लावुनियां । भवभया वारी जो ॥१६॥न पाहे ती इतस्तत: । ऐसें नित्य आचरत ।एके दिनीं मार्गांत । देखे अकस्मात राक्षसा ॥१७॥य क्षादिक ज्याला भीती । हिमाचलीं करी वस्ती ।त्याची पाहतां आकृती । प्राण होती कंठगत ॥१८॥सं निध येतां तीचा । तुषार पडला आर्द्रवस्त्राचा ।क्रूरभाव राक्षसाचा । गेला पुण्याचा प्रभावें ॥१९॥पं न जलकणयोगें । पूर्वस्मृती झाली वेगें ।नमूनी म्हणे कोणगे । आकाशमार्गें जासी तूं ॥२२०॥न मितों तुझे चरण । जासी कोठें तूं कोण ।कोठून तुझें आगमन । निवेदन करीं हें ॥२१॥य क्षिणी किंवा योगिनी । किंवा क्षिराब्धिनंदिनी ।वाटे तूं होसी भवानी । माझ्या कानीं दे वार्ता ॥२२॥स्वा गम तुझें रूप । लावण्यतेजें त्वद्रूप ।स्फुरे तेणें माझें दूर । होईजे अज्ञानांध ॥२३॥हा मी ब्रह्मराक्षस । नित्य करीं येथें वास ।कोणी न येती आसपास । करी ग्रास म्हणोनी ॥२४॥पो ट माझें सदां रितें । खातां गजादि जीवातें ।कधीं न जाणें तृप्तीतें । आज मातें शांत केलें ॥२५॥ष डरी नित्य खवळती । कधीं न ये स्वस्थ स्थिती ।ऐसी माझी दुर्गती । आज ती पालटली ॥२६॥य त्न न होतां दर्शन । झालें मला दैवें जाण ।करीं माझें उद्धरण । बहु शीण पावलों ॥२७॥पो र जेवीं मातेपुढें । आळ घेवोनी आड पडे ।तैसा मी हा तुझ्यापुढें । आड पडे मातोश्री ॥२८॥ष डिंद्रियें मी पाहिलीं । क्षणमात्रही नावरलीं ।पापकर्में म्यां केली । गती आली हे त्याची ॥२९॥य ज्ञादिक नाहीं केलें । परी क्षेत्रवासपुण्य भलें ।सहजची होतें घडलें । फल आलें तें आजी ॥२३०॥प रिसोनी त्याचें वचन । म्हणे अप्सरा करीं श्रवण ।तूं म्हणसी मी कोण । अप्सरा जाण निश्चयें ॥३१॥र हाणें माझें कैलासीं । मी असें उमेची दासी ।पूजीं नित्य शिवासी । मकरार्क माघमासीं विशेष ॥३२॥मं न्नाम कांचनमालिनी । प्रयागीं स्नान करूनी ।आल्यें जात्यें शिवभवनीं । अर्चीं भवानीपतीला ॥३३॥त्र यिमूर्तिच्या प्रसादें । सर्वत्र फिरें स्वच्छंदें ।राहें नित्य परानंदें । नसे संदेह मच्चितीं ॥३४॥प रम हा माघमास । सांप्रत चाले जो जनास ।स्नानें तारी आणिकास । नसे खास हे शक्ती ॥३५॥र विमंडलार्धोदयीं । स्नानाकरितां शीघ्र जायीं ।त्रिवेणी जल न्हेयीं । शिवपायीं अभिषेकीं ॥३६॥यं नामें पापी तरती । त्याची जडली मला भक्ती ।तेणें सर्वही मानिती । पूर्वस्थिती ऐक माझी ॥३७॥त्र पाहीन वेश्याजाती । तेथें माझी उत्पत्ती । रूप लावण्य संपत्ती । मीच होती कलिंगीं ॥३८॥प राक्रमी कलिंगेश । तो भुलोनी झाला वश ।त्याचे लुटिले सर्व कोश । केला दास त्याला मी ॥३९॥र डती त्याच्या अंगना । त्यांला न घडवी राजदर्शना ।इतरांही धनिकजना । ठकवीं नाना प्रयत्नें ॥२४०॥तं टा लावीं परस्परां । कपटें विश्वास दावीं जारां ।असे सेवीं अनंत नरां । दुराचारा करूनी ॥४१॥त्रा स न ये पापाचा । परिणाम हा अविचाराचा ।मातेरा नरदेहाचा । केला भोगाचा ल्हावानें ॥४२॥णि क्कींहिं जे समजती । परी तेही न उमजती ।कामाची न करवे शांती । भोगासक्ती करूनी ॥४३॥छिं न भिन्न करी यम । हें जाणें बुद्धस्तोम ।त्यालाही नावरे काम । तेथें नाम काय माझें ॥४४॥धि कारीं संतां महंतां । दुराचार नाणी चित्ता ।मांस मद्य खातां पितां । तारुण्यसरिता आटली ॥४५॥छिं न करी यम पाप्यांसी । हें दैवे पाघमासीं ।माहात्म्य ऐकतां कर्णासी । झोंबले मानसीं विरत्की ये ॥४६॥धि क्कारीं हीन कुलासी । तेवीच जार भोगांसी ।पुढें माझी गती कैसी । होईल ऐसी अनुतापें ॥४७॥ग्र स्त होवूनी मोहग्रहें । केलें जें जें पाप हें ।सांचविलें द्रव्य व्यर्थ हें । बरवा नोहे परिणाम ॥४८॥हान् याय कीं अन्याय । न विचारीं अपाय उपाय ।न धरिली बरवी सोय । आतां हृदय संतापे ॥४९॥नि त्य मानीं भोग गोड । अविवेकीं हें चर्मकुंड ।विकूनी पाप उदंड । केलें यमदंड भोगाया ॥२५०॥ N/A References : N/A Last Updated : May 23, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP