कल्पान्तरी स्त्रियांची मुंज
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
कसेही असो; मनुस्मृती व तदुत्तर काळच्या स्मृती यांत स्त्रियांसंबंधाने अगदी कडकडीत नियम झाले, व त्यांना पूर्वीच्या स्थितीत असलेले अधिकारही काढून घेण्यात आले. त्याच्या अगोदरच्या काळी, म्हणजे ज्याला आपले लोक ‘ कल्पान्तर ’ समजतात त्या काळी, स्त्रियांवर हा जुलूम नि:संशय नव्हता. फ़ार तर काय, हल्लीप्रमाणे स्त्रियांची लग्ने अमुक वर्षांच्या वयात झालीच पाहिजेत हा जुलमाचा नियमही त्या काळी नव्हता. त्या काळी स्त्रीवर्गाची मुंज होत असे, व त्यानंतर त्यांनी वेदपठन करणे, अगर संसारात शिरणे, अगर आजन्म अविवाहित राहणे हे त्यांच्या इच्छेवर असे. ज्या स्त्रिया आपले सर्व जन्म वेदविद्या शिकण्यात घालविण्याचा निश्चय करून अविवाहित राहात, त्यांना सर्व जन्म वेदविद्या शिकण्यात घालविण्याचा निश्चय करून अविवाहित राहात, त्यांना ‘ ब्रह्मवादिनी ’ अशी संज्ञा असे. गार्गी, वाचक्रवी, इत्यादी इतिहासप्रसिद्ध बायका याच वर्गातल्या.
इतर बायका, ज्या विद्यार्जनात जन्म न घालविता संसारात पडू इच्छित, त्यांना ‘ सद्योवधू ’ अशी संज्ञा मिळे. पराशरमाधव नामक ग्रंथात यासंबंधाने एक लेख आहे तो :
“ ननु असंस्कृताया: इति वचने विवाहरहिताया उत्तमलोकाभाव उक्त: सोनुपपन्न: । विवाहरहितानामपि ब्रह्मवादिनीनामुपनयनाध्ययनादिभिरुत्तमलोकसंभवात् । अत एव हारीतेनोक्तं । द्विविधा: स्त्रियो ब्रह्मवादिन्य: सद्योवध्वश्च । तत्र ब्रह्मवादिनानामुपनयनमग्नींधनं वेदाध्ययनं स्वगृहे भिक्षाचर्येति । वधूनां तूपस्थिते विवाहे कथंचिदुपयनमात्रं कृत्वा विवाह: कार्य इति ।
मैवं । तस्य कल्पान्तरविषयत्वात् । तथा च यम: ।
पुराकल्पे कुमारीणां मौज्जीबंधनमिष्यते ।
अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा ॥
पिता पितृव्यो भ्राता वा नैनामध्यापयेत्पर: ।
स्वगृहे चैव कन्याया भैक्षचर्या विधीयते ॥
वर्जयेदजिनं चीरं जटाधारणमेव च ॥ इति ’
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP