प्रस्तुतची कन्या पाहण्याची रीती, साखरपुडा इ.

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.

Tags :

वरील कलमात लिहिल्याप्रमाणे सांप्रतकाळी सामान्यत: स्थिती झाली आहे, तथापि तेवढ्यवरून ‘ कन्यापरीक्षा ’ या नावाच्या कृत्यास अजीबात फ़ाटा मिळाला आहे असा अर्थ समजावयाचा नाही. कारण बुगड्या गेल्या, पण कानांची भोके होती तशीच कायम राहिली आहेत, या न्यायाने हा कन्यापरेक्षेचा नाटकी प्रकार ‘ साखरपुडा ’ इत्यादी नावाखाली कसाबसा तरी होऊन जातोच. विवाहाच्या बाबतीत देण्याघेण्याच्या वगैरे मुद्द्याच्या गोष्टी अगोदर ठरून चुकल्या असतातच, व उभयपक्षांकडे वधूवरांचुया तसबिरा वगैरे दाखवून कन्या पसंत होण्याचे काम अगोदरच होऊन गेले असते; तेव्हा अशा स्थितीत वरपक्षाकडून पाहण्यात आलेल्या वडील मंडळीपुढे तिला नुसती आणा म्हणून सांगावयाचे, व तिनेही अगोदर शिकवून ठेविल्याप्रमाणे लाजत लाजत येऊन माहेरच्या मंडळीजवळ खाली मान घालून बसावयाचे, व नंतर वरपक्षाकडून ‘ मुली, तुझे नाव काय ? तुला भाऊ किती आहेत ? बहिणी किती आहेत ? ’ इत्यादी काही औपचारिक प्रश्न विचारण्यात आले असता तिने त्यांची उत्तरे अर्धवट हळू आवाजाने, पण आवाज अडखळू न देता द्यावयाची; की लागलीच तिच्या हातात साखरपुडा पडून तिला घरात उठून जाण्याविषयी निरोप मिळावयाचा. एवढे किंवा अशाचसारखे काही किरकोळ प्रकार होण्याचे बाकी राहतात, व तेवढे ते झाले म्हणजे कन्यापरीक्षेचे कृत्य सांग झाले असे लौकिकात मानण्यात येते.

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP