प्रसंग आठवा - वेदांती पंडित
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
स्वयें संस्कृत संस्कार जाणती । ते अनेक भाषा प्राकृते हितोपिती । दाटूनि खोल श्र्लोक करिती । कवि पंडित म्हणऊनी ॥११॥
कवित्व संस्कार खोलपणा । ऐसेंचि धुंडितां गमाविलें जीवपणा । जैसी पेंड धरूनी रस टाकी घाणा । तैसे पंडितां जालें ॥१२॥
जैसे स्तन चुकोन करडें । अजागळ चोखिती वाडें कोडें । तैसे पंडित जाले असती वेडे । निजबोध चुकोनियां ॥१३॥
बारीक सूत कांतती माहारी । उंच शेला नाहीं त्यांच्या अंगावरी । तैसी निर्गुण भक्तिविण भरोवरी । कुशल पंडिता तैसी ॥१४॥
काष्टें करवतून करवत वेगळा । तैसी माया करवतून साधु निराळा । त्याचे शबद लगती जनाला अग्निज्वाळा । जैसें करवताचे दांत ॥१५॥
तोंडा मोळा वत्स जुंबरे धेनूस । कांसेसी रिघतां ते मारी त्यास । तैसे वेदशब्दें पुसतां साधूस । निज पान्हा न द्रवती ॥१६॥
बुधला भरून आदळी लिखिटी । तैसे साधु न करती तोंडपिटी । आनंदी देखोनि अधिकार दृष्टि जैसे दाविजें धृत भोक्त्या ॥१७॥
जैसा पेंडी धरूनी फिरे घाणा । तेल जाऊनि पडे आणिकाच्या भाणा । तैसेंच जालें असें शास्त्रगणा । स्वयें चवी निज भक्त घेती ॥१८॥
गोडीच्या अंगे वाढतसे ऊंस । गोडी चवी कांही न लगे त्यास । तैसें जालेसें वैदिकांस । प्रेम गोडी साधु घेती ॥१९॥
जिवा अंगें वाढे स्थूळ रोमावळी । परि ते जीवास नेणें सर्व काळी । तैसा वेद सगुण गुण नव्हाळी । वर्णना करित असे ॥२०॥
दुग्ध दोहोनि पाहातां नयनीं । असोनि न दिसे धृताची वाणी । तैसी भ्रांति या वेदांलागुनी । वर्णना करूनि असे ॥२१॥
क्षीरीं धृत निवडावयालागुनी । ताऊनि शाहाणे लाविजे विरजणीं । सायासें देती रवीनें मंथुनी । लोणी गौळणी केलेसें ॥२२॥
तैसे वेदीं बोलोनि शब्दकळा । दवडली असे भेदाची लीळा । सोऽहं प्रेम निज सुखाचा जिव्हाळा । नेणती आत्मत्वें ॥२३॥
रवी निवडूं नेणें घृतालागुनी । तैसे वेद नेणें ईश्र्वर धनी । शोका पातला स्तवनालागुनी । अंध ‘धर्म जागो’ जैसा ॥२४॥
‘धर्म जागो’ यज्ञ घाला तवरुर । सांगितल्या नांवाचा करी उच्चार । दृष्टीं नाहीं देखिले लहान थोर । काळें काय गोरेसें ॥२५॥
लोणी ताविल्या जळे ताकट पाणी । फेंस निवळल्या घृत दिसे लोचनी । तैसे साधु निमग्न होऊनि । स्वरूप पहाती ॥२६॥
ऐसें सायासें घृत निवडिलें । मेळविल्या क्षीरीं नाहीं मिळालें । प्रसिद्ध तें वेगळेंचि राहिलें । परिसा प्रचोनें ॥२७॥
ऐसे साधु सर्वथा वेदीं निवडिलें । ते परतोनि वेदीं नाहीं मिळालें । हे साक्ष स्वयें अनुभवें बोलले । शेख महंमद गुप्तरूपें ॥२८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP