प्रसंग आठवा - वेदांत
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ॐ नमोजी अलक्ष अगम्य अगोचरा। निज निवांत खाणीवाणीच्या माहेरा । तुज वर्णितां अव्यक्त दिगंबरा । शिले वेद श्रुती ॥१॥
वेद श्रुती ‘नेति नेति’ म्हणती । विधि मतें शास्त्रें भांबावती । सद्गुरुकृपेविण नाहीं विश्रांति । या निजपदाची ॥२॥
चारी वेद ईश्र्वरापासूनि जाले । परी ईश्र्वरां नेणतां काळवंडले । उलथोन बाहेर पडले । जैसें तांट दाण्याचें वेगळें ॥३॥
तांट दाण्याची एक असे मिळणी । परी तांट नेणेंचि दाण्यालागुनी । तांट चिरल्या दाणा न दिसे नयनीं । तैसें दाण्यांत तांट असे ॥४॥
जीव शरीर जाणे त्या नखास । नख नेणें जीव शरीरास । तैसा वेदांचा ईश्र्वरीं स्पर्श । आथीच ना श्रोते हो ॥५॥
उदकापासाव घृत तेल जालें । परी तें उदकास नेणतां व्यर्थ गेलें । मागुतें उदकामाजि मेळविलें । मिळणीं मिळे ना ॥६॥
निवडे तेल घृत मिळे जळा । तरी वेद ईश्र्वरासी जाणें तात्काळा । ऐशा श्रुती साक्षी वेगळाल्या बरळा । बोलतां पाप जोडे ॥७॥
मन जिव्हा जाणें षड्रसांची चवी । तैसाच पाहिजे स्वयें अनुभवी । नाहीं तरी आण गुंतला आणिकां गोंवी । कांतणी जाळिंद्री जैसा ॥८॥
स्वयें उगवला आणिकांते उगवी । जैसा स्वयें उजेडला रवि । निशीनें गुंतलीं त्यांतेंहि उगवी । पर उपकार करूनियां ॥९॥
जन्म उगवलिया उपकारसमान । आणिक न दिसे दुसरेपण । अनेक उपकार केले संतजनें । पुन्हां मागुती पाविजेती ॥१०॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP