मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्री जीवन|बहीणभाऊ| रसपरिचय ५ बहीणभाऊ रसपरिचय १ रसपरिचय २ रसपरिचय ३ रसपरिचय ४ रसपरिचय ५ रसपरिचय ६ रसपरिचय ७ रसपरिचय ८ रसपरिचय ९ बहीणभाऊ - रसपरिचय ५ चार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते. Tags : lokgeetoviओवीमराठीलोकगीतस्त्रीजीवन रसपरिचय ५ Translation - भाषांतर घरांत चंदनाचे पाट आणून ती मांडते. भावासाठीं काय करूं, काय न करूं असें तिला होतें :चंदनाचे पाट मांडीले हारोहारींआज आहे माझ्या घरीं भाऊबीज ॥कधीं भाऊ भाऊबीजेला बहिणीच्या गरि घरीं येतो किंवा तिला घरीं माहेरीं नेतो. माहेरीं सार्या बहिणी जमलेल्या असाव्या. भाऊबीज होऊन जावी. पुन्हा सासरीं जाण्याची वेळ यावी. त्या वेळीं बहिणी म्हणतात :आम्ही चारी बहिणी चार डोंगरांच्या आडमाझ्या भाईराया खुशालीचें पत्र धाड ॥आम्ही चौधी बहिणी चारी गांवाच्य चिमण्यासख्या भाईराया आम्ही घटकेच्या पाहुण्या ॥दादा, वर्षांतून एकदां आम्हांला भेटत जा, एकदां आणीत जा. आम्ही घटकाभर राहूं, प्रेम लुटूं व उडून जाउं, एक चार आण्यांचा साधा खण व रात्रभर तुझ्या घरीं विसांवा. दुसरें कांहीं नको :बहिणीला भाऊ एक तरी गे असावापावल्याचा खण एका रात्रीचा विसांवा ॥माहेरीं गेल्यावर भाऊभावजय कशीं वागतात तें बहिणींना कळून येतें. भावजयीला बहिणी म्हणतात :दसरा दिवाळी वरषाचे दोन सणनको करूं माझ्यावीण वयनीबाई ॥माहेरीं जावें तों भावजयीला बरें वाटत नाहीं. नणंदा कशाला आल्या असें त्यांना वाटतें :गोर्ये भावजयी नको बोलूं रागें फारआल्यें मी दिवस चार माहेराला ॥परंतु ही प्रार्थना फुकट जाते. धुसफूस सुरू असते. बहीण मनांत म्हणते :गोरी भावजय गर्विष्ठ बोलाची मला गरज लालाची भाईरायाची ॥भाऊ ग आपला वयनीबाई ती लोकांचीमनें राखावीं दोघांचीं ताईबाई ॥भावजयीचें वतेंन पाहून बहिणीला वाईट. आपल्या भावाला वैनी बोलते हें पाहून बहीण कष्टी होते :गोर्ये भावजयी नको बोलूं एकामेकीहळुवार भावजया चंद्र कोमेजेल एकाकी ॥गोर्ये भावजयी किती उर्मट बोलणेंमन दुखवीलें माझ्या भावाचें कोंबळें ॥गोर्ये भावजयी किती बोल रागाचे फूल कोमेजलें देवा शिवाशंकराचें ॥गोर्ये भावजयी किती बोल अहंतेचे फूल कोमेजलें ममतेचे ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP