मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|आत्मस्वरूपस्थिति| अभंग १३ ते १५ आत्मस्वरूपस्थिति अभंग १ ते ५ अभंग ६ ते १० अभंग ११ ते १२ अभंग १३ ते १५ अभंग १६ ते २० अभंग २१ ते २५ अभंग २६ ते २८ आत्मस्वरूपस्थिति - अभंग १३ ते १५ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpadअभंगनामदेवपद अभंग १३ ते १५ Translation - भाषांतर १३. नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केबीं पावती ब्रम्हासुख ॥१॥लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥३॥झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥नामयाची जनी निर्गुणीं बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥१४. शब्दाचें ब्रम्हा लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥स्वयें सुखें धाला आपणातें विसरला । तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥नामयाची जनी सागरीं मिळाली । परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥१५. अखंडित ध्यानीं । पांडुरंग जपे वाणी ॥१॥पांडुरंग नाम जपे । हेंचि माझें महा तप ॥२॥ऐसें आलें प्रत्ययासी । सहज तेणें तत्त्वमसी ॥३॥पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥४॥संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 04, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP