नामसंकीर्तन माहात्म्य - अभंग १० ते १२
सदर अभंग संत जनाबाइंना उद्देशून रचिले आहेत.
१०.
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्ठला ॥१॥
पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तया विघ्न ॥३॥
जनी म्हणे हरिहर । भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥
११.
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळां । दासी ननीसी नित्य चाळा ॥३॥
१२.
मारूनियां त्या रावणा । राज्य दिधलें बिभिषणा ॥१॥
सोडवुनी सीता सती । राम अयोध्येस येती ॥२॥
ख्याति केली रामायणीं । म्हणे नामयाची जनी ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : January 23, 2015
TOP