मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नामसंकीर्तन माहात्म्य| अभंग १ ते ३ नामसंकीर्तन माहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ नामसंकीर्तन माहात्म्य - अभंग १ ते ३ सदर अभंग संत जनाबाइंना उद्देशून रचिले आहेत. Tags : abhangjanabainamdevpadअभंगजनाबाईनामदेवपद अभंग १ ते ३ Translation - भाषांतर १. गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥आठवितां पाय त्याचे । मग तुम्हां भय कैंचें ॥३॥कायावाचामनें भाव । जनी म्हणे गावा देव ॥४॥२. जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥वाचे नाम विठ्ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥नाम तारक त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥३. नाम फुकट चोखटे । नाम घेतां नये वीट ॥१॥जड शिळा ज्या सागरीं । आत्मारामें नामें तारी ॥२॥पुत्रभावें स्मरण केलें । तया बैकुंठासी नेलें ॥३॥नाममहिमा जनी जाणे । ध्यातां विठठलचि होणें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP