मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|ध्रुवचरित्र| भाग ३१ ते ३३ ध्रुवचरित्र भाग १ ते ५ भाग ६ ते १० भाग ११ ते १५ भाग १६ ते २० भाग २१ ते २५ भाग २६ ते ३० भाग ३१ ते ३३ ध्रुवचरित्र - भाग ३१ ते ३३ संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangdhruvanamdevअभंगध्रुवनामदेव भाग ३१ ते ३३ Translation - भाषांतर ३१. स्तवीनसे वाचे जोडोनियां कर । वेदां अगोचर ऐसें कांहीं ॥१॥धन्य धन्य आतां उद्धरलों स्वभावें । माझें मज ठावें झालें निज ॥२॥विश्वाच्या विसांव्या जिवाचिया जिवा । देवाचिया देवा दिनानाथा ॥३॥सूंचि सर्वां आदिमायची अवधी । तुजविण कधीं दुजें नाहीं ॥४॥एक तूं अनेक अनेकीं तूं एक । येणेही सांशंक बोलवेना ॥५॥दातृत्वाची आदी कल्याणाची निधी । चित्तमन बुद्धि सर्व तूंची ॥६॥तुझीये कृपेनें गेले भावाभाव । आणिक मागावें ऐसें नाहीं ॥७॥कधींही कोणता चळेना ढळेना । माते ऐशा स्थाना बैसवावें ॥८॥नामा म्हणे ऐसी करीत प्रार्थना । घाली लोटांगणा पायांवरी ॥९॥३२. आश्वासोनी देव बोलिले ध्रुवासी । इच्छा तुझी जैशी तैसें करूं ॥१॥सहज सत्येनें ऐसें कांहीं जहालें । अढळ दिधलें बैसावया ॥२॥चंद्र सूर्य तारा शशि ऋषी भोर । हे ज्या आधारें हिंडताती ॥३॥ब्रम्हलोक साचे परी ते न नासे । ऐशा परी त्यास बैसविले ॥४॥क्षतेचा दिवस योजनें उन्नती । बेसवी श्रीपति ध्रुवालागीं ॥५॥सवी सर्वत्नांच्या लोचना गोचर । रमणीये अपार वर्णवेना ॥६॥नामा म्हणे दुजें वैकुंठ केवळ । भक्तालागीं केलें देवरायें ॥७॥३३. ऐसें झालें पूर्ण ध्रुवाचें आख्यान । ऐकती जर जन एका भावें ॥१॥तयावरी कृपा देवाची होईल । केलें तें लाभेल सर्व काज ॥२॥पुत्राभिष्ट पुत्र धनाभिष्ट श्वन । जैसें ज्याचें मन तैसें होय ॥३॥नामा म्हणे तया कल्याण सर्वदा । चिंतितां गोविंदा काम पुरे ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP