सम अलंकार - लक्षण २

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


समाच्या दुसर्‍या भेदाचें उदाहरण :---
“वडवानळ, कालकूट विष, लक्ष्मी, मगर व सर्प यांच्या समूहाबरोबर एकत्र वाढलेला चंद्र, विरही जनांचे प्राण घेण्याला कारण कां नाहीं होणार ?”
लक्ष्मीला, वरील यादींत, मारक म्हणजे प्राण घेणारी वस्तु म्हणून, कवीला सांगावयाचें आहे.
तिसर्‍या समाचें उदाहरण :---
“हे राजा ! निधन मिळण्याच्या इच्छेनें आम्ही मोठया प्रयत्नानें तुझी उपासना केली, आणि आम्हाला (खरोखरीचें) निधन [(१) खूप संपत्ति व (२) मरण हे दोन्हीही अर्थ येथें घ्यावें] मिळालें. लोकांना इच्छित वस्तु देणारी अशी तुझी सेवा आहे खरी !”
ह्या ठिकाणीं मरण व पुष्कळ धन या दोन अर्थांचें श्लेषानें ऐक्य निर्माण केलें गेले आहे; व त्यामुळेंच बहुधनरूपी इष्ट, हा अर्थ हातीं आल्यानें इष्टार्थ प्राप्तिरूप समालंकाराचा चमत्कार या ठिकाणीं निर्माण झाला आहे. या श्लोकांत असणार्‍या व्याजस्तुतींतील, सुरवातीला, (म्ह० स्तुतिरूप अर्थ घेतांना) धनप्राप्तिरूप अर्थ एकदम मनांत येतो; व त्यामुळें येथें समालंकार निर्वेधपणें होऊं शकतो. पण मरणप्राप्ति हा निन्दापर अर्थ प्रतीत होण्याचे वेळीं मात्र व्याजस्तुतीच संपूर्ण प्रकट होत असल्यानें, तिच्याकडून विषमालंकाराचा बाध केला जातो.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP