परिकर अलंकार - लक्षण ४
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
‘हे द्विजराज, हे कलाधार हे अखिल विश्वाच्या तापाचें निवारण करणार्या (चंद्रा), मला अबलेला (स्त्रीला) आपल्या क्रूर किरणांनीं हे निर्दया ! तूं कसा बरे जाळतोस ?
ह्या श्लोकांत, अभिप्रायगर्भ विशेषणें अधिक असल्यामुळें, व्यंग्याचेंही आधिक्य झालें आहे.
हा परिकार अलंकार, वाच्यसिदध्यंग हें गुणीभूत व्यंग्य व्यंग्य ज्याच्या पोटांत आहे असा एक, व उपस्कारक व्यंग्य (म्ह० अपरांग) ज्याचे पोटांत आहे असा दुसरा; व पुन्हां तो ‘व्यंग्य वाच्यासारखें होणे’ हा एक व त्याच्या उलट म्हणजे व्यंग्याचें व्यंग्यत्व कायम राहणें (म्ह० प्रतीयमान राहणें) असा दुसरा; अशा प्रत्येकी होणार्या दोन प्रकारांनीं एकंदर चार प्रकारचा होतो. यापैकीं परिकराच्या पहिल्या प्रकाराचें उदाहरण हें :---
“देहादिक पदार्थ ज्यांतील खोटें मृगजळ आहे अशा संसाररूपी मारवाडयातल्या मोठया वाळवंटाला सोडून, कृपारूपी लाटांनीं भरलेल्या हे परमेश्वरा ! माझा मनरूपी हरिण, तुझ्या ठिकाणीं यथेच्छ अवगाहन करू इच्छित आहे.” ह्या ठिकाणीं अवगाहन (डुंबणें) या अर्थाची सिद्धि करण्याचें अंग, ‘कृपासपी लाटांनीं भरलेल्या’ या शब्दांनीं व्यक्त होणारें जे समुद्ररूपी व्यंग्य तें (जवळ जवळ) वाच्यार्थाच्या कक्षेंत आल्यासारखेंच झाले आहे.
परिकाराच्या दुसर्या प्रकाराचें उदाहरण हें :---
“ज्यानें इंद्राचा गर्व ठेंगणा केला आहे (म्ह० हरण केला आहे) आणि ज्यानें आपल्या चक्राच्या योगानें एकदम मगराचें मुख फाडून टाकलें आहे, (गजेद्रमोक्षाचे वेळीं), आणि ज्यानें लीलेनें वराहाचा आकार धारण केला आहे, असा तूं माझा उद्धार करण्यास समर्थ नाहींस हे कसें ?”
ह्या ठिकाणीं गोवर्धन पर्वत, गजेंद्र, व पृथ्वी यांचा उद्धार हें व्यंग्य, वाच्यकक्षेचा स्पर्शही न झालेलें असें असून, उपालंभ (टोचून बोलणें) या वाच्यार्थाच्या सिद्धीचें अंग झालें आहे. तिसरा म्ह० वाच्यायमान उपसकारक व्यंग्यगर्भ हा परिकराचा प्रकार, वर ‘मदकामविमोह०’ इ० श्लोकांतल्या ‘धृतशार्ङ्गगदारिनन्दक’ या पदांत आला आहे. व चौथा म्ह० उपस्कारक गुणीभूतव्यंग्य प्रकार ‘मन्त्रैर्मीलितं.’ इ० ह्या श्लोकांत “वीचिक्षालितकालियाहितपदे” या पदांत आलेला आहे.
येथें रसगंगाधरांतील परिकारालंकार प्रकरण समाप्त झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP