परिकर अलंकार - लक्षण २
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“स्थास्नुजंगमसंभूतविषहनत्र्यै नमो नम:”
“स्थावर व जंगम प्राण्यांत उत्पन्न झालेलें विष दूर करणार्या हे भागीरथी ! आम्ही तुला वारंवार नमस्कार करतों” या आगमाच्या (म्ह० पुराणाच्या) वचनाच्या बळावर, वरील परिणाम अलंकारामुळें होणारें विषयींचें विषयाशीं तादात्म्य न मानलें तरी सुद्धां, केवळ सापानें उत्पन्न केलेला संताप नष्ट करण्याचें सामर्थ्यही भागीरथींत स्वभावसिद्धच आहे. अशारीतीनें वाच्यार्थ निष्पन्न होत असतांनाही म्ह० सरळ बसत असताही, विशिष्ट सौंदर्य उत्पन्न करण्याकरतां ‘वीचिक्षांलित०’ इत्यादि अभिप्रायगर्भ विशेषण मुद्दाम घातलें आहे. या ठिकाणीं श्रीकृषणाला दुसरीं नांवें असतांही, कालियाहित या शाब्दाचा प्रयोगाच्या सामर्थ्यानें, “फणांवर नृत्य करण्यानें. ज्यानें कालिया सर्पाला नि:सत्व करून टाकला त्या भगवंताच्या चरणाच्या ठिकाणीं, विषहरण करण्याची लोकोत्तर शक्ति अगोदरपासूनच सिद्ध होती; पण त्या चरणांना भागीरथीनें लाटांनी धुऊन टाकल्यामुळें त्या शक्तीचे आश्रय जे चरण त्यांच्यावरील धुळीच्या कणांच्या द्वारां ती शक्ति आतां भागीरथीच्या ठिकाणी आली” असें सूचित होतें. येथें कोणी अशी
शंका घेतील कीं, कालियामर्दनाच्या पूर्वींच, श्रीकृष्णाच्या चरणांतील विषहरणशक्ति भागीरथीच्या पाण्यानें धुऊन गेल्यामूळें त्या नंतरच्या अलिकडल्या काळांत त्या चरणांनीं कालियाचें विषहरण करणें हें कसें शक्य आहे ? पण ही शंका बरोबर नाहीं. कारण पाय घुऊन टाकल्यानंतर बाकी राहिलेली जी थोडीसी शक्ति चरणामध्यें होती, तिनें सुद्धां आतां कालियाचें विषहरण केलें, असाही गूढ अर्थ ह्या ठिकणी आहेच; तेव्हां यांत गैर कांहींच नाहीं. अशा रीतीनें वाच्याला खुलविणारें हें व्यंग्य या ठिकाणीं गौण झालें आहे. वाच्यार्थाचा सिद्धि करण्याचें अंग म्हणून गौण झालेलें नाहीं (म्ह० या ठिकाणीं वाच्यसिद्धयंग या नांवाचें गुणीभूत व्यंग नसून, अपरंग या नांवाचें गुणीभूत व्यंग आहे.
अथवा (परिकर अलंकाराचें) हें दुसरें उदाहरण :--- “शार्ङ्ग धनुष्य, गदा, चक्र (अरि) नंदक (या नांवाचा खडग) यांना धारण करणार्या हे श्रीकृष्णा ! मद, काम, मोह, मत्सर हे शत्रू तुझ्या समक्ष (धडधडीत तुझ्यासमोर) तुझा म्हणून गणल्या गेलेल्या मला जोरानें ओढीत आहेत. हें तुला कसें दिसत नाहीं ?”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP