पिंड ब्रह्मांड निवारण - षष्टम पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.


॥ श्रीगणेशायनम: ॥ श्रीआदिपुरुषायनम: ॥

माझा मीचि सदा असें तेथें कैंचें द्वैत पिसें ।
नाहीं आहे कल्पीतसें । मज माझी मी जाणे ॥१॥
द्वैत अद्वैत कालविलें । आपणा आपण नाहीं ह्मणे ।
आपण आपणा आहेपणें । आहे ऐसें माझें भान कदा नाहीं नाहींसें ॥२॥
द्वैत अद्वैत कल्पिलें । सत्यासत्य मीचि केलें ।
आलें नाहीं गेलें आलें । सकळ माझी कल्पना ॥३॥
मुंगी पासूनि ब्रह्मादिक । लोक कल्पिले अनेक ।
स्वर्ग नर्क अवश्यक । भोग ते ही कल्पिले ॥४॥
अवस्था चारी अभिमानी । मंत्रा चारी चारी गुणी ।
मज माजी मी कल्पोनी । जैसा आहे तैसा मी ॥५॥
पिंड ब्रह्मांडाचा साक्षी । कार्य कारण मी लक्षी ।
स्थान मान मी परिक्षी । करूनि कर्ता मी ॥६॥
विराट हिरण्यगर्म माया । चवथी जे कां मूळ माया ।
स्थूळ सूक्ष्म कारण माया । महाकारण कल्पिलें ॥७॥
उत्पत्ति स्थिति संहारण । सर्व साक्ष चवथें जाण ।
जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तूर्या तेही कल्पना ॥८॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । चवथा जाण सर्वेश्वर ।
विश्व तेजस प्रत्यक् पर । आत्मा तेही कल्पिलें ॥९॥
परा पश्यंती मध्यमा । चवथी वाचा वैरवरीरवा ।
ऋक्‍ यजुर्वेद सामा । अथर्वण कल्पिलें ॥१०॥
स्थूळ प्रविक्त आनंद । चवथा भोग अवभासानंद ।
अकार उकार मकार मात्रार्ध । चारी स्थानें कल्पना ॥११॥
काय भाग्य वर्णूं माझें । मजसीं सांपडलों आज ।
शून्य कारणासी पूज्य । पडिलें काय वर्णूं मी ॥१२॥
धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं धन्य आम्हीं ।
धन्य आम्हीं धन्य आम्हीं । धन्य आम्हीं आम्हांसी ॥१३॥
धरितां सद्नुरुचे पाय । कृत कृत्य झाली माय ।
सद्नुरुसी उतराय । होऊं जातां होईना ॥१४॥
ऐसें सांगू जातां फार । कैसा लागे मी पामर ।
वैष्णवानें दिला कर । वाचा दुर्बळ बोले मी ॥१५॥
कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य कृत कृत्य ।
कृत कृत्य कृत कृत्य । कृत कृत्य झालों मीं ॥१६॥
धन्य माता पिता धन्य । धन्यवंश तो स्वजन ।
धन्य बंधू की बहिण । माझा संग असे ज्यां ॥१७॥
माझ्या वंशा झाली गती । माझ्या पेटी जगत्पती ।
माझ्या वंशीं झाले होती । धन्य धन्य माझ्यानें ॥१८॥
ऐसे टांकितां उद्नार । वेडे मज म्हणती नर ।
होऊं तयांचा उद्धार । माझी निंदा करूनी ॥१९॥
स्वजनाहूनि निंदक जन । जरी सुरव त्यां माझे न ।
मज विपरीत करणें । निंदकांसी आधार ॥२०॥
आम्हीं देहासी निंदितों । जरी निंदक साह्य होतो ।
आम्हीं गुरुचि मानितों । हितोपदेशी ते झाले ॥२०॥

इति शीलघुआत्ममथने । गुरुशिष्य कथने । जिवन्मुक्ती निरूपणनाम षष्टम पद समाप्त:

॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP