पिंड ब्रह्मांड निवारण - प्रथम पद

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.


॥ श्रीराम ॥

॥ अथ पिंड ब्रह्मांड निवारण ॥

पिंड ब्रह्मांड स्थूळ जाणा । मथूनि काढितों मी पणा ।
परी एथें अनुसंधाना । धरूनि असिलें पाहिजे ॥१॥
पांच भूतांची ते परी । मुळापासूनि शेवटवरी ।
तेचि ऐकावी चतुरीं । एकाग्रतें करूनी ॥२॥
पृथ्वी आण आप तेज । वायू आकाश सहज ।
एकेक भुताचें काज । वर्णितों मी सावध ॥३॥
रोम त्वचा नाडी मांस । अस्थि जाण पांचवा अंश ।
यांत कोण आपण असे । विचारूनि पहावें ॥४॥
स्वेद लाळ रक्त रेत । मूत्र पांचचें कळत ।
आपण तो कोण यांत । विवेकें मी जाणावा ॥५॥
क्षुधा तहान आलस्य निद्रा । रती जाण अग्नी सारा ।
यांत मी म्हणे कोण रवरा । सांग शिष्या सावध ॥६॥
चळण वळण प्रसरण । अकोचन निरोधन ।
यांत मी मी म्हणतो कोण । विचारूनि सांगावा ॥७॥
कामक्रोध शोक मोह । पांचवें तें भय ।
हा आकाश पर्याय । यांत मी तो कोण रे ॥८॥
पांच भूतांचे पंचविस । अर्थ कथिले सावकाश ।
शरण जातां वैष्णवांस । मी मी म्हणतां समजे ॥९॥
माझें ऐसें जे बोलती । तेची आपण कैसे होती ।
सर्व माझेंचि म्हणती । तेचि कैसा आपण ॥१०॥

इति श्रीलघुआत्ममथने, गुरुशिष्यकथनें स्थूलदेह निवारण प्रथम पद समाप्त: श्रीसीताराम चंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP