शिवरात्रमाहात्म्य - अभंग १६ ते २०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१६.
ऐकतांचि शब्द होऊनि किरात । राहिला निवांत एके ग्रामीं ॥१॥
पाळणपोषण विषयांची वोढी । करीतसे जोडी पात-काची ॥२॥
चण्ड भिल्लनाम घेतलें ठेऊनि । दुष्टभाव मनीं वाढ-विला ॥३॥
कासेसीं वाधुरा हातीं शूळं दंड । सामोग्री उदंड मेळविली ॥४॥
हिंदे नान वन पर्वत शिखरें । मारीतसे फार जीवजंतू ॥५॥
जातीचा स्वभाव लागला तयासी । कष्टे अहर्निशीं ह्मणे नामा ॥६॥

१७.
ऐसें असतां तो सरूम आला काळ । प्रारब्धाचें बळ कैसें पाहा ॥१॥
हिंडता हिंडता फार कष्टि झाला । दृष्टिस तयाला न पडे कांहीं ॥२॥
कडे दरी मोठया पर्वताचे वरी । रिघोनियां करी नाना युक्ती ॥३॥
झाली सांजवेळ न मिळे आमीष । होऊनि उदास राहिलासे ॥४॥
नाना ह्मणे मग काय त्यानें केलें । ऐकावें निश्चळें साधूजनीं ॥५॥

१८.
मार्गही राहिला जाऊं कोणीकडे । आमीष न जोडे काय कीजे ॥१॥
चिंताज्वरें फार तापलें अंतर । क्षुघेचा आडदर पोटामध्यें ॥२॥
रिक्त जाऊं तरी नाहीं कांहीं घरीं । वाट पाहे घरीं दारा-पुत्र ॥३॥
पाहूम जातां काहीं नाठवे विचार । तेणें स्थिरस्थिर पाय टाकी ॥४॥
नामा ह्मणे तेव्हां देखे सरोबर । कांहींसा विचार करूं लागे ॥५॥

१९.
भोंवतालें जाळें घाली नेटेंपाटें । हस्तकीं तिखट बाण धरी ॥१॥
येतील उदकपानासी सावजें । पाहे त्याचे व्याजें रोखोनियां ॥२॥
तेथें एक बिल्ववृक्ष महाथोर । वेंघोनियां वर बैसलासे ॥३॥
डोळ्याआड आलीं ह्मणोनियां तोडी । अंतरीं आवडी आमीषाची ॥४॥
बकाचियेपरी ध्यानस्थ राहिला । जीविंचा जिव्हाळा वेगळाची ॥५॥
नामा ह्मणे ऐसी दैवाची नव्हाळी । न करितां झाली देवपूजा ॥६॥

२०.
लक्षवरी बिल्वदळें माथा वाहे । आनंद न समाये महादेवा ॥१॥
बहुता काळाचें तेथें एक लिंग । होतें भूमिभाग होऊ-नियां ॥२॥
भोळा महादेव तेणें संतोषला । ह्मणे करी मला कोण पूजा ॥३॥
नामा ह्मणे पाहे निमित्याची वाट । पुराणीं बोभाट असे त्याचा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP