श्रीराममाहात्म्य - रामचरित्र

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
धन्य ते संसारीं पवित्र ते वाणी । अखंड उच्चारणी रामनाम ॥१॥
तयांचीच एक सरली येरझार । उतरले पार भव-नदी ॥२॥
वधोनी ताटीका सुबाहुही देख । सिद्धि नेला मख कौ-शिकाचा ॥३॥
पहावया यावे स्वयंवर सीतेचें । आलें जनकाचें पत्र तेथें ॥४॥
मारगीं चालतां ब्रम्हीयाची बाळा । उद्धरली शिळा पदरजें ॥५॥
मोडील धनुष्य तया हें देईन । केला होता पण ज-नकानें ॥६॥
रावणादि राजे आले थोर थोर । त्यांचा उत-रला नूर पाहतांची ॥७॥
अहर्निशीं जया ध्यानीं ध्याय भोळा । तो उठला सांवला बाप माझा ॥८॥
सुरां असुरां असाध्य ऐसें तें प्र-चड । तें तीं ठायां कोदंड मोडियलें ॥९॥
पाहोनी ऐसें नामा म्हणे बळ । सीता घाली माळ रघुवीरा ॥१०॥

२.
संत समागमें चाले दळभारू । आशा तृष्णा देश-धडी अहकारू ॥१॥
दुम दुम दुम दुम भेरी वाजे । आले अयो-ध्येसी श्रीरघुनाथ राजे ॥२॥
भक्तभद्रजाती दोन्ही बाहीं चालत । विष्णुदास नामा कीर्ति वाखाणित ॥३॥

३.
पैल आला रामराणा । लंका दिधली बिभिष्रणा ॥१॥
नळनीळ जांबुबंत । मध्यें चाले रघुनाथ ॥२॥
मागें वानराचे थाट । पुढें गर्जताती भाट ॥३॥
केला अयोध्या प्रवेश । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥

४.
राम पिता सीता माता । लक्ष्मण सोयरा चुलता ॥१॥
तयांसी भेटों जाऊं आतां । चित्रकूटींच्या पर्वता ॥२॥
नाना म्हणे माझें गोत । चित्रकूटीं असे नांदत ॥३॥

५.
काळे गोरे धनुर्वाडे । ते चालताती रामापुढें ॥१॥
राम निळिये गुढारी । कनक दंड चवरे वरी ॥२॥
चला चित्रकूटीं जाऊं । राम दशरथाचा पाहूं ॥३॥
अयोध्ये केला अवतारु । राम नामया दातारु ॥४॥

६.
गोरे सांवळे घनवटे । एक चालती एकापुढें ॥१॥
राम निळीय पुढारी । कनकदंड चौरेवरी ॥२॥
राम लक्ष्मण विजयी झाले । आनंदें अयोध्ये आले ॥३॥
चंद्रगिरीचे तळवटीं । राम सीतेसी झाली भेटी ॥४॥
चंद्रगिरीं चला जाऊं । राम दाशरथी पाहूं ॥५॥
चंद्रगिरीं केला वास । म्हणे नामा । विष्णुदास ॥६॥

७.
ह्मणसी बिभिषण शाहणा । परि तो महा मूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला । भेटून रामचि नाहीं झाला ॥२॥
राम दृष्टी देखतांची । पदवी न घेववेचि त्याची ॥३॥
कोण हित केलें तेणें । राम न कळी चिंतनें ॥४॥
जरी तो झाला लंकापती । नाश पावेल कल्पांतीं ॥५॥
नामया स्वामी तें जाणोन । अवघा रामचि होईन ॥६॥

८.
श्रीराम सोयरा आला माझ्या घरा । दिधला म्यां थारा ह्लदयीं माझा ॥१॥
पावलों विश्रांति धालें माझें मन । न लगे आतां ध्यान शिकावया ॥२॥
ज्या साठीं हिंडणें जटामौन नग्न । ध.रिलें तेणें ठाणें ह्लदयीं माझ्या ॥३॥
योग याग तप करावें साधन । तोहि जाण ओंठीं सदा वसे ॥४॥
तीर्थयात्रा देव ज्यासाठीं करावे । तें ब्रह्म बरवें नांदे देहीं ॥५॥
ब्रह्मचर्यादिक आश्रम साधावे । केली तया देवें देहीं वस्ती ॥६॥
वेदशास्त्र पुराण ज्यासाठीं पठण । तो नांदे परिपूर्ण ह्लदयीं माझ्या ॥७॥
ऐसा तो सज्जन जिवलग सांगाती । दिधली मज विश्रांति नामसंगें ॥८॥
तैसें नव्हे ज्ञान फुटक्या हां-डोरयाचें । धरूनियां साचे खोखा वाजे ॥९॥
स्वधर्मीं विचार वेंचाचे अन्वयें । लाधले हे पाय गुरुकृपें ॥१०॥
अभंग भंगेना फोडितां फुटेना । गुरुकृपें जाणा प्राप्त जालें ॥११॥
चावळी वटवूट बोलणें बासर । हे तंव अवघे चार मर्कटाचे ॥१२॥
परनिंदा परद्रौहो करणें या संतांचा । जाळावी ते वाचा ज्ञान त्याचें ॥१३॥
न लगे सोंग ध-रणें देह ताप करणें । ऐसें निजध्यान हातां आलें ॥१४॥
नाम घेतां रूप ह्लदयीं बिंबलें । सर्वत्र देखिलें तेंचि डोळां ॥१५॥
नाम-मंत्र बीज नाहीं जंववरि । केशव तंववरि प्राप्त नाहीं ॥१६॥
नामाचे धारक ते केशवरूप । वैकुंठींचें सुख रुळे पायीं ॥१७॥
नामें-विण ज्ञान नपूंसक ऐसें । नातळती कैसे साधुसंत ॥१८॥
नाम तेंचि रूप रूप तेंचि नाम । नाम रूपाभिन्न नाहीं नाहीं ॥१९॥
आकारला देव नामरूपा आलें । म्हणोनि स्थापिलें नामदेवें ॥२०॥
नामापरता मंत्र नाहीं वो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥२१॥
नामा ह्मणे ज्ञान केशव केवळ । जाणती प्रेमळ भले भले ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP