मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|श्रीराममाहात्म्य| रामजन्म श्रीराममाहात्म्य रामजन्म रामचरित्र सीताशुद्धि श्रीराममाहात्म्य - रामजन्म संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल रामजन्म Translation - भाषांतर १. कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥धर्मशास्त्र ऐसें डोहळे पुसावे । त्यांचें पुरवावे मनोरथ ॥२॥ऐकोनियां ऐसें आनंद मानसीं । कैकई सदनासी जाता झाला ॥३॥मंचकीं बैसली होती ते पापिणी । देखतां नाययीं पहूडली ॥४॥सुंदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरि गर्मिणी नामा ह्मणे ॥५॥२.राजा ह्मणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसीं सांग आतां ॥१॥येरी ह्मणे ऐसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्य-पट ॥२॥ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचार त्याचा आह्मां ॥३॥जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहू ॥४॥माझिये मस्तकीं ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश नाहीं नाहीं ॥५॥निंदितील जन मज वाटे सुख । ऐकतांची दु:ख राया झालें ॥६॥वृश्चिकाचे पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥ऐशी व्यथा होय नामा ह्मणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथूनियां ॥८॥३.येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगीं लेपन तीर्थोदकें ॥३॥गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशीं पतिव्रते ॥६॥प्राणनाथा ऐसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥ऐकतांचि ऐसें कांते़चें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥घेऊनियां हातीं रत्नाचें भूषण । टाकी ओंवाळून नामा म्हणे ॥१०॥४.दशरथ राजा उठिला तेथुनी । कौसल्ये सदनीं जातां झाला ॥१॥पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरीं तेज निचे ॥२॥तुझिये मानसीं होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपाशीं ॥३॥उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें कैंची उरी देहभावा ॥४॥सदा समाधिस्थ रामरूप झाली । कौसल्या माउली नामा म्हणे ॥५॥५.न बोलेची कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्चयेंसी ॥१॥माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । ह्मणोनियां विघ्न ओढवलें ॥२॥निवारी हें दु:ख वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शनें ॥३॥तुझा मी किंकर आजी अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥नामाचा उच्चार ऐकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥राजा म्हणे कांहो ऐसी हे अवस्था । कांहो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥विश्वाचा मी आत्मा स्वयें असें राम । मजमाजी भ्रम कैंचा असे ॥७॥अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणे ॥८॥६.रावणें हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुज-लागीं ॥१॥आणीरें धनुष्य मारीन रावणा । लंका बिभिषणा देईन मी ॥२॥अंगद सुग्रीव्व जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥टाकोनी पर्वत बुजवारे सागरा । पायवाट करा जाव-यासी ॥४॥लंके पुढें मोठें माजवीन रण । तोडीन बंधन सुरवरांचें ॥५॥विश्वामित्र याग नेईंन मी सिद्धी । मारीन कुबुद्धि दोघांजणां ॥६॥खर दूषणांचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळें ॥७॥ध्याती मज त्याची बहुत आवडी । न विसंबें घडी त्याची एक ॥८॥बोलिला वाल्मिक तैसोंचि करीन । वर्तोनि दावीन नामा ह्मणे ॥९॥७.परबह्म पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपा-चिया ॥१॥करीति बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लव-करी ॥२॥येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्ट-भाव ॥३॥राजा ह्मणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥श्रावणवधाचें अघ नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारबधासी ॥५॥ऐकतांचि हांसे सावध होऊनि । बोलतसे झणीं नामा ह्मणे ॥६॥ ८.विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥परेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येचे उदरीं तोचि असे ॥२॥बोलियेले जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांहीं ॥३॥माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मीं कांता लक्षुमीच्या ॥४॥धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठ-नायक पाहातील ॥५॥धन्य पशूपक्षी श्वापदें तरुवर । राजा रघु-वीर पाहातील ॥६॥त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नाम-याच्या बापा पाहाशील ॥७॥९.उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसंताचा दिवस ॥१॥शुक्ल-पक्षीं ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥माध्यान्हीसी दीनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणी ॥४॥सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥नाहीं कौ-सत्येस्री भान । गर्भीं आले नारायण ॥६॥अयोनीं संभव । प्रगटला हा राघव ॥७॥नामा ह्मणे डोळं । पाहीन भुवनत्रयपाळा ॥८॥१०.सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥कमळाकार नेत्र आकर्ण शोभती । कुंडलें झळकती कर्णीं ज्याच्या ॥३॥सरळ नासिक लावण्य मुखचंद्र । हनुवटी सुंदर राघवाची ॥४॥कंठाचा आकार कंबुग्रीवा ऐसा । ह्लदयावरी ठसा द्वजिपद ॥५॥सुकुमार सुरेख जयाचें उदर । ब्रह्मांडें अपार वसती जेथें ॥६॥नाभीकमळींचा ब्रह्मा नेणे अंत । कडदोरा शोभत कटीं ज्याच्या ॥७॥दंडीं पेटया करीं जडित मुद्रिका । पिंवळा नेटका पीतांबर ॥८॥केशराची उटी सरळ बाहूदंड । चिमणा कोदंड हातीं ज्याच्या ॥९॥गर्जती नेपुरें कोमळ चरणीं । वज्रांकुश चिन्हीं विराजीत ॥१०॥कौस्तुभ मुक्तमाळा रुळे वैजयंती । भ्रमर भुलती नामा म्हणे ॥११॥११.सांगतातील दाया । तुम्हां पुत्र झाला राया ॥१॥ऐक-तांचि ऐसें कानीं । हर्ष न समाये मनीं ॥२॥उठा उठा हो त्वरेंसी । पाचारावें वसिष्ठासी ॥३॥ब्राह्मणासी पाचारा । सांगा सर्व नारी-भरा ॥४॥फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥१२.अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरीं । ध्यातसे त्रिपुरारी अह-र्निशीं ॥१॥पाहातसे मुख दशरथ त्याचें । भाग्य मी तयाचें काय वर्णूं ॥२॥गंध पुष्प वस्त्रें अर्पोनियां द्बिजां । समभावें पूजा सक-ळांसी ॥३॥साखरेच्या गोण्या घाला हत्तीवरी । धाडीं घरोघरीं नामा ह्मणे ॥४॥१३.करितसे स्नान अजाचा बाळक । वस्त्रें अमोलिक परि-धान ॥१॥लावोनियां भाळीं कस्तुरी केशर । करी नमस्कार वसिष्ठासी ॥२॥पुण्याहवचनीं बैसे दशरथ । त्रिभुवनीं समर्थ तूंचि एक ॥३॥वेदमंत्र घोष करिती ऋषेश्वर । पुष्पें सुरवर वरु-षती ॥४॥आणिती बाहेर अयोध्येचे जन । करिती गायन गायक जे ॥५॥नाचती अप्सरा वाजती नगारें । वाजंत्री तुतारे भोंवारे ही ॥६॥गुलालाची धूम रंग वस्त्रावरी । बंदीजन द्वारीं गर्जताती ॥७॥नामा ह्मणे इंद्रें पाहोनियां सभा । नाहीं ऐसी शोभा चित्तीं ह्मणे ॥८॥१४.बाई कशाच्या नवबता । पुत्र झाला दशरथा ॥१॥चला चला तेथें जाऊं । कौसल्येचें बाळ पाहूं ॥२॥नवसें बहुत । तिशीं पावला भगवंत ॥३॥घ्याग घ्याग त्वरें वाण । झगा फडकी पेहरण ॥४॥करूनि शृंगारा । येती राजयाच्या घरा ॥५॥पाहतां सुकुमार सांवळा । लवूं विसरला डोळा ॥६॥सार्थक जन्माचें । नामा ह्मणे झालें त्यांचे ॥७॥१५.भांडारी येऊनि करिती प्रार्थना । द्विजांसी दक्षणा काय द्यावी ॥१॥जया लागे जितुकें तितुकें त्यानें घ्यावें । तुह्मीं न रहावें उभें तेथें ॥२॥धांवताती तेव्हां बिप्र सकळिक । एकाबरीं एक पड-ताती ॥३॥करूं नका घाई सर्वांसी पुरेल । न राहे दुर्बळ यांत कोणी ॥४॥नामा म्हणे ऐसें धन वाटी राजा । सुखी केल्या प्रजा सकळीक ॥५॥१६.ब्राह्मणांची इच्छा पूर्ण झाली जेव्हां । आशिर्वाद तेव्हां वइताती ॥१॥कल्पकोष्टी यासी नाही नाहीएं भय । सकळांचें ध्येय हेंचि असे ॥२॥तपाचिया राशी जाहल्या बहुत । ह्मणोनियां सुत झाला तुज ॥३॥तथास्तु ह्मणोनि जोडीत अंजुळ । पायांवरी भाळ नामा म्हणे ॥४॥१७.बाई कौसल्येचा पुत्र । दिसे सर्वांही विचित्र ॥१॥ऐसें वाटे माझ्या चित्तीं । प्रगटली विष्णुमूर्तीं ॥२॥झणीं होईळ या दृष्ट । मोडताती कानीं बोट ॥३॥तिच्या भाग्यें असो सुखी । याचा म्हणे सर्वांमुखीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP